अशी लावा मुलांना शिस्त

अशी लावा मुलांना शिस्त

Discipline

मुलांचे संगोपन करताना त्यांना शिस्त कशी लावावी हा सर्वच पालकांपुढील प्रश्न. अनेकदा पालकांमधील शिस्तीबाबतीतील मतभेद मुलांच्या गैरवर्तुणीकीला कारणीभूत ठरतात. शिक्षणाद्वारे चांगली वागणूक अमलात आणणे म्हणजेच शिस्त होय. यासाठी शिक्षा कशाबद्दल व कोणत्या चुकीबद्दल व गैरवर्तणुकीबद्दल आहे, हे समजून देऊनच शिक्षा करावी.

शिस्त लावताना हे लक्षात ठेवा

प्रसंगी कौतुक, प्रसंगी शिक्षा करा : मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळाले किंवा बक्षीस मिळाल्यास त्याची स्तुती करावी. त्यांना शाबासकी द्यावी म्हणजे त्याला आणखी चांगले वागण्यास प्रोत्साहन मिळेल. त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त करावी व जरूर तर शिक्षाही करावी.

मुलांना आज्ञा न करता, विनंती करा : ’पाणी आण’, असे न सांगता ’राजा मला एक ग्लास पाणी आणून देशील का ?’, अशी विनंती करावी.

घरातील सदस्यांमध्ये एकवाक्यता : मुलाला शिस्त लावण्यापूर्वी मुलाकडून नेमक्या कशा वागणुकीची अपेक्षा आहे, याचा विचार करून आपली भूमिका निश्चित करावी व दुमत होऊ देऊ नये.आई-वडिलांची व घरातील इतर मंडळींची एकवाक्यता मुलाला शिस्त लावण्याच्या कामी अत्यंत आवश्यक असते. शिक्षा केव्हा करावी यासंदर्भातील मतभेद आईवडिलांनी अगोदरच सोडवून ठेवावेत. मुलासमोर सोडवू नये.

चूक झाल्यास लगेच शिक्षा करावी : ’थांब संध्याकाळी बाबांना येऊ दे, मग बघते’ ही चुकीची शिक्षा आहे. त्यामुळे बाबा येईपर्यंत मुलगा शिक्षेच्या काळजीत रहातो. मुलाने केलेल्या चुकीच्या तुलनेशी शिक्षा मिळते-जुळते असावे.

First Published on: April 8, 2019 4:30 AM
Exit mobile version