दिवाळी फराळ बिघडू नये यासाठी वापरा ‘या’ टिप्स

दिवाळी फराळ बिघडू नये यासाठी वापरा ‘या’ टिप्स

दिवाळी म्हटलं की सगळ्यात आवडीचा विषय पहिला येतो तो म्हणजे फराळ. फराळानी भरलेलं ताट जरी समोर आली तरी पोट भरून जात. प्रत्येक घरातील महिला कुटुंबाच्या आवडीप्रमाणे फराळातील हे पदार्थ बनवत असतात. यात रवा लाडू, बेसन लाडू, शंकरपाळे, कंरज्या, चकली, चिवडा अशा एकाहून अधिक पदार्थ बनवले जातात. प्रत्येक स्त्री जीव ओतून हे पदार्थ खास करण्यासाठी प्रयत्न करते. मात्र काही वेळा फराळातील तो पदार्थ फसतो, मनाप्रमाणे बनत नाही. अशावेळी फसलेल्या पदार्थांच नेमक करायचं काय असा प्रश्न सतावतो. असे न होण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहोत. या टिप्स नेमक्या काय आहेत, जाणून घेऊ…

रव्याचा लाडू, बेसणाचा लाडू आणि करंज्या हे पदार्थ दिवाळीत महत्त्वाचे असतात. मात्र हे बनवण्याची अनेकांची पद्धत वेगळी असते. मात्र हेच पदार्थ बनवताना अनेकदा चुका होतात आणि पदार्थ नीट बनत नाही. यासाठी काही सोप्या टीप्स फॉलो करा आणि हे पदार्थ परफेक्ट करा…

1. करंजा तळताना अनेकदा त्या तेलात फुटतात. यामुळे त्यातील सारण तेलात पसरते आणि सर्व तेल खराब होतं.
असे होऊ नये म्हणून करज्यांच्या कडांना कापसाच्या बोळ्याने दूध लावावे.

२. शक्य असल्यास करंजी करताना मोहन चांगल्या तुपाचे घालावे. तूप नसेल तेलही चालते. आता मोहन थंड झाल्यावर पीठाला चांगले मळून घ्यावे.

३. करंज्याचे पीठ नीरशा दुधात तिंबावे. यानंतर अर्ध्या तासांनी करंज्या करायला घ्या, यामुळे करंजा खुसखुशीत होतात.

४. करंजीसाठी भिजवलेले पीठ शेवटपर्यंत मऊ राहावे यासाठी ते सुती कपड ओला करुन त्यात गुंडाळून ठेवा.

५. रवा लाडूसाठी रवा भाजल्यानंतर उतरवून त्यावर चार चमचे दूध शिंपडावे, यामुळे रवा छान फुलतो आणि रव्याला छान चवही येते.

६. रवा लाडू चविष्ट होण्यासाठी पाक झाल्यावर त्यात ड्रायफ्रूट मिक्स पावडर मिक्स करावा आणि त्यात रवा घालावा. त्यामुळे लाडू मऊ होतो.

७. बेसनाचे लाडू चांगले होण्यासाठी बेसन चांगल भाजून घ्या, त्यावर एका वाटीला एक चमचा दूध शिंपडावे, यामुळे लाडू चविष्ट होतात.

८. बेसनाच्या लाडूसाठी बेसन भाजून घेतल्यानंतर ते कोमट झाल्यानंतर एका वाटीला एक चमचा या प्रमाणात मिल्क पावडर घालावी ज्यामुळे लाडूला चांगली चव येते.

९. बेसनाच्या लाडूसाठी तूपाचे प्रमाण योग्य असावे अन्यथा लाडू खूप सैल नाहीतर जास्त कडक होतात.


माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्या शिंदे-फडणवीस जबाबदार; खासदाराचं पोलीस महासंचालकांना पत्र

First Published on: October 18, 2022 1:58 PM
Exit mobile version