सेल्फी काढताय ! जरा जपून

सेल्फी काढताय ! जरा जपून

Selfie

आजची तरुणाई सेल्फीश झाली आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षण हा सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट टाकून सगळ्यांसोबत शेअर करण्याचे व्यसन तरुणांसोबत सर्व वयोगटातील लोकांना लागलं आहे. दोन-तीन दिवस सलग सुट्ट्या आल्यात की लगेच मित्र-मंडळी, कुटुंब भटकंतीचे नियोजन करतात. तेथील निसर्गाचे सौंदर्य बघून एक सेल्फी तो बनता हैं.. असे नकळत बोलले जाते. आपल्या आठवणी कॅमेर्‍यात कैद जरूर करा; पण जरा जपून.

सेल्फी काढताना घ्या खबरदारी..

*सेल्फी काढताना अति धाडस करू नका. ज्या जागेवरून सेल्फी काढणार असाल ती जागा सुरक्षित आहे की नाही याची खात्री करून घ्या.

*समुद्र किनारा, डोंगर-दर्‍यांचा अंदाज घेऊन फोटोग्राफी करा.

*शक्यतो उंचावर असलेली ठिकाणं खोल समुद्र या ठिकाणी जाऊन सेल्फी काढणं टाळा. सेल्फी स्टीकचा वापर करा.

*पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात रस्त्याच्या मध्यभागी वाहने उभी करून किंवा थांबून सेल्फी काढू नका.

*आवश्यक असेल त्याच ठिकाणी सेल्फी काढा किंवा फोटोग्राफी करा.

*सेल्फी काढताना अपघात तसेच एखादी दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घ्या.

First Published on: February 2, 2019 5:57 AM
Exit mobile version