Benefits Of Exercise : नियमित व्यायाम केल्याने टेन्शन होईल गायब

Benefits Of Exercise : नियमित व्यायाम केल्याने टेन्शन होईल गायब

शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे फायदेशीर ठरते. व्यायामामुळे केवळ तुमचे बॉडी स्ट्रक्चर सुधारत नाही तर मानसिक आरोग्यवर याचा परिणाम होतो. दिवसभरात तुम्ही काही वेळ जरी व्यायाम केलात तरी शरीरातील हॅप्पी हार्मोन्स रिलीज होऊ लागतात. ज्याचा परिणाम शरीर आणि मनावर होतो. ज्याने शरीर आणि मन निरोगी राहते. व्यायामामुळे टेन्शनपासूनही सुटका होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, जे लोक नियमित व्यायाम करतात. त्यांचे शरीर आणि मेंदू अधिक ऍक्टिव्ह असतो. व्यायामामुळे मेंदूला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, ज्याने न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरचा धोका कमी होतो. तुम्ही दिवसभरात थोडा वेळ जरी व्यायाम केलात तरी शरीरातील डोपामाईन, सेरोटोनिन आणि नॉरएंड्रेनालाईनची पातळी वाढवण्यास मदत होते. या हार्मोन्समुळे केवळ मूड स्विंग कमी होत नाही तर फोकसही वाढतो. एकंदरच, व्यायाम केल्याने मेंदूवर होणार परिणाम बराच काळ टिकतो.

दैनंदिन व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. त्याचबरोबर नित्यनेमाने व्यायाम केला पाहिजे.

दैनंदिन व्यायाम करण्याचे पाच फायदे (Benefits of Daily Exercise)

मेंदूत रक्तप्रवाह वाढतो (Blood Circulation )

मेंदूत रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी, व्यायाम अवश्य करावा. याने गोष्टी लक्षात ठेवण्यास आणि त्या सहज समजण्यास मदत होते. तसेच तुमची एकाग्रता वाढविण्यासाठी याची मदत होते.

स्ट्रेस कमी होतो  (Stress Buster)

मेंदूच्या हिप्पोकॅम्पसमधील स्ट्रेस रिसेप्टर्सची संख्या कंट्रोलमध्ये आणण्यासाठी दररोज व्यायाम करावा कारण स्ट्रेस रिसेप्टर्स कमी झाल्याने मेंदूवरील स्ट्रेस हार्मोन्सचा प्रभाव कमी होतो. जे लोक रोज व्यायाम करतात, त्याच्या आयुष्यातील स्ट्रेस कमी होऊ लागतो.

एकाग्रता वाढते (Increase concentration)

व्यायाम केल्याने शरीराला भरपूर प्रमाणत ऑक्सिजन मिळतो. यामुळे शरीरातील रक्ताचा स्त्राव नियमित होतो, ज्यामुळे सोशल एन्झायटी आणि ब्रेन फॉगच्या समस्येपासून आराम मिळतो. परिणामी, मेंदू पूर्णपणे एका कामावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करू शकतो. याशिवाय मेंदूमध्ये रक्तप्रवाह वाढल्याने नवीन पेशींचा विकास होतो, ज्यामुळे मानसिक आरोग्यास चालना मिळते.

लॉन्ग टर्म मेमरी (Long term memory)

दररोज 30 मिनिटे व्यायाम केल्याने मेंदू रिलॅक्स आणि ॲक्टिव्ह राहतो. याने मेंदूमध्ये गोष्टी बराच काळ गोष्टी साठून राहतात आणि तुम्ही गोष्टी विसरत नाही. यासाठी दिवसातून 2 वेळा व्यायाम करणे फायद्याचे ठरते.

मेंटल हेल्थ बूस्ट करण्यासाठी किती वेळ व्यायाम करावा ? (Timing for exercise)

एका संशोधनानुसार, मानसिक आरोग्यास चालना देण्यासाठी, प्रौढांनी आठवड्यातून कमीतकमी 150 मिनिटे माध्यम तीव्रतेचा व्यायाम करायला हवा. याशिवाय 75 मिनिटांचा हाय इंटेंसिटी व्यायाम करणे आवश्यक आहे. जर तुमचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक असेल तर आठवड्यातील 3 दिवस तरी व्यायाम करावा.

 


हेही पहा : जागरणाचा आरोग्यावर होतो परिणाम

 

Edited By – Chaitali Shinde

First Published on: April 16, 2024 12:40 PM
Exit mobile version