Thursday, May 16, 2024
घरमानिनीपावसाळ्यात या किल्ल्याला नक्की भेट द्या

पावसाळ्यात या किल्ल्याला नक्की भेट द्या

Subscribe

रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरला १४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या दिंडोरी पासून हा १० मैलाच्या अंतरावर आहे. हा किल्ला मराठ्यांनी साडेसहा वर्ष मुघलांविरुद्ध लढवला होता. ह्या किल्ल्याबद्दल अशी आख्यायिका सांगतली जाते की येथे श्रीराम जेव्हा श्रीलंकेकडे जात होते तेव्हा येथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले होते.

श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड, परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता. ही सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता.

- Advertisement -

 

- Advertisement -

मार्ग

गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नाशिक-पेठ मार्गावरील आशेवाडी ह्या गावातून किल्ल्यावर जायला मळलेली वाट आहे. तासाभरात किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ल्याचा विस्तार प्रचंड असला तरी पाण्याचे टाके, स्थानिक देव-देवतांची मंदिरे आणि पडझड झालेली तटबंदी ह्याखेरीज किल्ल्यावर फारसे बघण्यासारखे काही नाही. हा किल्ला मराठ्यांनी मुघल सैन्याला केलेल्या चिवट प्रतिकाराबद्दल प्रसिद्ध आहे.

इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकायचा चंग बांधला होता. मोठ्या सैन्यबळानिशी तो इ.स. १६८२ला महाराष्ट्रावर चाल करून आला. आपल्या शहाबुद्दीन फिरोजजंग ह्या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली. फिरोजजंगाने रामशेजपासून सुरुवात केली. किल्ल्यावर (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) नावाचे किल्लेदार होते. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. ते रामशेजच्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.

शहाबुद्दीन फिरोजजंग ३५ ते ४० हजार फौजफाट्यासह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला तेव्हा किल्लेदार (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) ५००-६०० मावळ्यांसोबत गडावर होता. मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकू. पण मराठ्यांच्या गनिमी काव्याने त्याच्या सैन्याला पुरते जेरीस आणले. गडावरील दगडगोट्यांच्या वर्षावाने मुघल सैन्याचे स्वागत झाले. गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती. अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि दाणागोटा गडावर पळवून आणीत.

संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी जनावरांचे कातडे लावून लाकडाच्या तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरू केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगरून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.

मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि किल्ल्याच्या उंचीचा ८०-९० तोफा आणि 200 सैनिक बसतील एवढा मोठा लाकडी बुरूज बनवला. (याला लाकडी दमदामा असेही म्हणतात). या लाकडी बुरुजांवरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठेसुद्धा या लाकडी बुरुजांवर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे हटायला तयार नव्हते. शहाबुद्दीनच्या हाती यश येत नव्हते.

दोन वर्षांनंतरही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला.

- Advertisment -

Manini