गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनामुळे वजन वाढते का?

गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनामुळे वजन वाढते का?

आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरी आणि घर सांभाळणे हे महिलांपुढे असलेले मोठे आवाहन आहे. यामुळे भविष्याचा विचार करून मुलाची घाई न करता हल्ली बरेच कपल्स कुटुंबनियोजनाचा पर्याय निवडतात. यावेळी महिला प्रामुख्याने गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. पण या गोळ्यांच्या सेवनामुळे वजन वाढत असल्याची तक्रार महिलांकडून होत असते. (contraceptive pills)

मात्र तज्ज्ञांच्या मते गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वजन वाढत नाही. आपल्याकडे मुलींचे २३-२४ व्या वर्षी लग्न केले जाते. या वयात महिलांमध्ये हार्मोन्स बदलत असतात. यामुळे त्यांचे थोडेफार वजन वाढते.

तज्ज्ञांच्या मते या वयात फ्लुईड रिटेंशनमुळे महिलांचे वजन वाढते. तर कधी कधी खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाल्याने किंवा स्ट्रेसमुळेही वजन वाढते. यामुळे गर्भनिरोधक गोळ्यांमुळेच वजन वाढण्याची शक्यता जवळजवळ अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

First Published on: November 4, 2022 8:07 PM
Exit mobile version