फ्रिजमध्ये अंडी ठेवावीत की ठेवू नयेत? काय सांगतात तज्ज्ञ

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. तसेच अंड्यात शरीरासाठी आवश्यक असलेले प्रोटीन्स असल्याने डॉक्टरही अंडी खाण्याचा सल्ला देतात. यामुळे आपण बऱ्याचवेळा जास्त अंडी बाजारातून आणतो आणि ती फ्रिजमध्ये ठेवतो. पण तज्ज्ञांच्या मते अंडी फ्रिजमध्ये कधीच ठेवू नयेत. त्यापेक्षा ती सामान्य तापमानात बाहेर ठेवावीत.

साधारणत अनेक जण नाश्तामध्ये ऑम्लेट , बॉईल अंडी खातात. अंडी रोजच लागत असल्याने बाजारातून एक दीड डझन अंडी आणली जातात . फ्रिजमध्ये पदार्थ अधिक काळ ताजे राहत असल्याने ही अंडी आपण फ्रिजमध्ये ठेवतो. पण ब्रिटनचे सेलिब्रिटी शेफ जेम्स मार्टीन यांनी नुकत्याच एका शोमध्ये फ्रिजमध्ये अंडी ठेवणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अंड्याचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

फ्रिजमध्ये अंडी का ठेवू नयेत?
मार्टीन यांच्यामते अंड्याच्या बलकावर सुक्ष्म छित्रे असतात. जर अंडी फ्रिजमध्ये ठेवली तर या सूक्ष्म छिद्रातून फ्रिजमध्ये ठेवलेल्या इतर पदार्थांचा गंध आणि चव त्यातून शोषली जाते. परिणामी अंड्याच्या मूळ चवीत फरक पडतो. त्यामुळे जर तुम्हाला अंड्याच्या मूळ चवीचा आस्वाद घ्यायचा असेल तर अंडी बाहेरच सामान्य तापमानात ठेवा. तसेच बाजारातून अंडी आणली की ती लगेच न वापरता. थंड पाण्यात धुऊन घ्यावीत. नंतरच वापरावीत. कारण बरेच जण बाजारातून आणलेली अंडी थेट वापरतात. त्या अंड्यावर धूळीचे कण असतात.ती तशीच वापरल्यास त्यातील धूलीकणही जेवणात येतात.

First Published on: January 17, 2022 4:42 PM
Exit mobile version