Home Remedy : संत्र्याची साल फेकू नका, असा करा वापर

Home Remedy : संत्र्याची साल फेकू नका, असा करा वापर

आंबट-गोड संत्री खायला अनेकांना आवडते. संत्री खायला चविष्ट असतात पण त्यामध्ये अनेक पोषक तत्व आणि आरोग्यासाठी फायदे देखील समाविष्ट असतात. पण कित्येक चांगल्या गुणांनी भरपूर संत्र्याची साल तुम्ही फेकून देता का? बहुतेक लोक संत्री खाऊन त्याचे साल कचऱ्यामध्ये टाकून देतात पण तुम्ही असे करू नका. संत्र्याची सालीचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी, साफसफाई आणि स्वयंपाक घरापासून गार्डनपर्यंत केली जाऊ शकते. एकूणच संत्रं हे आपल्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर फळ आहे. पण या फळाची सालही आपल्यासाठी तेवढीच फायद्याची आहे.

जेवणातील चव वाढवण्यासाठी संत्र्याच्या सालीचा वापर

जेवणातील चव वाढवण्यासाठी वापर मासे आणि भाज्यांमध्ये मसालेदार चवीसाठी संत्र्याचे साल वापरा.
इतर औषधी वनस्पती आणि ही साले वाळवून बारीक करा. त्यात मीठ आणि काळी मिरी घाला, मिक्स करा आणि तुमचा मसालेदार मसाला तयार होतो. याच्या मदतीने तुम्ही लिंबूपाणीपासून ते मॅरीनेडपर्यंत सर्व काही तयार करू शकता.
ही साले तुम्ही चहामध्येही वापरू शकता. चहा किंवा इतर कोणतेही पेय बनवताना ही साले घाला. यामुळे चहाला चव येते.

जास्त काळ साखर साठवून ठेवण्यास उपयुक्त

संत्र्याच्या सालीचा वापर जास्त काळ साखर साठवण्यासाठी केला जाऊ शकतो. बेकिंगसाठी वापरला जाणारा ब्राऊन शुगरचा पॅक उघडल्यानंतर काही वेळातच खराब होऊ लागतो आणि त्यात गुठळ्या तयार होऊ लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही या साखरेच्या पाकीटात 2 ते 4 संत्र्याची साले टाकू शकता, असे केल्याने साखर चांगली राहते.

नैसर्गिक क्लिनर बनवा

नैसर्गिक क्लिनर बनवण्यासाठी लिंबूवर्गीय साले व्हिनेगर आणि पाण्यात मिसळा.यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातून कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही. त्यातून तुम्ही किचन फ्रेशनरही बनवू शकता . यासाठी ही साले औषधी वनस्पतींसोबत उकळत्या पाण्यात टाकून उकळा. त्याची वाफ तुमच्या स्वयंपाकघरात सुगंध पसरवेल. एवढेच नाही तर ते स्प्रे बाटलीत भरून डस्टबिनभोवती शिंपडू शकता.

 केसांसाठी संत्र्याची साल फायदेशीर : 

हेअर फ्रेशनर

उन्हाळ्यात वारंवार घाम येणे आणि केस बांधणे यामुळे केसांना दुर्गंधी येऊ लागते. कधी कधी सुगंधी हेअर प्रोडक्ट्सने केस धुतल्यानंतरही केसांमधून घामाचा वास येऊ लागतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी संत्र्याची साल खूप उपयुक्त आहे. तुम्ही यासाठी ताजी साले वापरू शकता. यासाठी एका पातेल्यात 1 लिटर पाणी घेऊन त्यात 2 संत्र्यांची साले टाकून उकळा. झाकण ठेवून पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. ते गाळून, थंड करून स्प्रे बाटलीत भरा. केसांच्या मुळांवर स्प्रे करा आणि ते कोरडे होऊ द्या आणि दिवसभर ताजा सुगंध अनुभवा.

कोंड्यासाठी उपयुक्त

संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये दही आणि लिंबाचा रस मिसळून पॅक बनवा. टाळूवर मसाज करा आणि अर्धा तास केसांवर राहू द्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे शॅम्पू आणि कंडिशन करा. यामुळे कोंड्याच्या समस्येत आराम तर मिळेलच पण स्कॅल्प इन्फेक्शनही दूर राहील.

त्वचेसाठी संत्र्याची साल फायदेशीर : 

First Published on: March 18, 2024 12:59 PM
Exit mobile version