Omicron Variant: ओमिक्रॉनपासून स्वत:चा बचाव करायचाय? तर डाएटमध्ये खा ‘हे’ पदार्थ

Omicron Variant: ओमिक्रॉनपासून स्वत:चा बचाव करायचाय? तर डाएटमध्ये खा ‘हे’  पदार्थ

Omicron Variant: ओमिक्रॉनपासून स्वत:चा बचाव करायचाय? तर डाएटमध्ये खा 'हे' पदार्थ

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. ओमिक्रॉन किती धोकादायक आहे याबाबत आतापर्यत कोणतीही ठोस माहिती हाती आलेली नाही. मात्र कमजोर रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या नागरिकांना ओमिक्रॉनचा धोका असल्याचे म्हटले जात आहे. आजार कोणताही असो आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर कोणत्याही आजाराशी दोन हात करू शकतो. जाणून घ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करायचा.

तुळस

शरिरारीतल रोगप्रतिकारक शक्ती वाढवणयासाठी तुळसीच्या पानांचे सेवन करा. शरिर निरोगी ठेवण्यासाठी तुळसही एक वरदान आहे. अनेक आजारांपासून तुळस आपले रक्षण करू शकते. थंडीच्या दिवसांमध्ये अनेक वेळा सर्दी, खोकला सारखे आजार होत असतात. या आजारांवर घरगुती उपाय म्हणून तुळशीची पाने किंवा तुळशीचा रस फायदेशीर ठरतो. त्याचप्रमाणे तुळशीच्या पानांच्या सेवनाने किंवा वासाने चिंता, ताण, थकवा दूर होण्यास मदत होते.

तसेच तुळशीच्या पानांमध्ये एंटीऑक्सिडेंट असतात. जे शरिरातील टॉक्सिन कमी करण्यासाठी मदत करतात आणि शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात. दररोज सकाळी तुळशीच्या चहाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.

आवळा

आवळ्यातही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचे गुणधर्म असतात. थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला दूर करण्यासाठी आवळ्याचा मोठा फायदा होतो. त्यामुळे तुमच्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे कधीही योग्य. आवळ्यात व्हिटामीन सी, अमिनो अॅसिड यासारखे पोषक तत्वे असतात. दररोज तुम्ही आवळ्याचे ज्युस, आवळ्याचा मुरांबा किंवा लोणच्याचे सेवन करू शकता. आवळ्याचे सेवन ह्रदय,यकृत, फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

अश्वगंधा

भारतासह मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील काही भागांमध्ये अश्वगंधा ही वनस्पती आढळते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा उपयोगी येते. अश्वगंधाचे सेवन केल्यास तणाव हलका होतो आणि शांत झोप येते.


हेही वाचा – हिवाळ्यातील सांधेदुखी! हिवाळ्यात सांध्यांची काळजी कशी घ्यावी?

First Published on: December 25, 2021 5:51 PM
Exit mobile version