‘या’ बियांचे सेवन करा आणि आरोग्य उत्तम ठेवा

‘या’ बियांचे सेवन करा आणि आरोग्य उत्तम ठेवा

'या' बियांचे सेवन करा आणि आरोग्य उत्तम ठेवा

बऱ्याचदा आहारातील काही अशा बिया असतात की त्यांचा आपल्या आरोग्याला उत्तम असा फायदा होतो. तसेच नकळतपणे आपण त्या बियांचे आहारातून सेवन करतो. कित्येकदा तर त्यांचा फायदा काय होतो हे देखील आपल्या लक्षात राहत नाही. मात्र, अशा काही बिया आहेत. ज्यांचा आपल्या आरोग्याला उत्तम असा फायदा होतो. चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या बिया आहेत त्यांचा आरोग्यावर कसा आणि काय फायदा होतो.

सब्जा

ओमेगा ३ चे प्रमाण जास्त असल्यामुळे सब्जाचे सेवन केले जाते. सब्जामुळे रक्तातील साखरेचे असंतुलित प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच जर शरीरात साखरेचे प्रमाण अधिक असल्यास ते कमी करण्यातही सब्जा उपयोगाचा ठरतो. त्यासोबतच सब्जा हा थंड असल्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन केले जाते. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी देखील सब्जाचा वापर केला जातो.

अळशीच्या बिया

रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी अळशीच्या बियांचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तसेच कर्करोगाचा धोकाही या बियांच्या सेवनाने कमी होतो.

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बियांमध्ये ओमेगा ६ चे प्रमाण आढळून येते. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासही त्यांची मदत होते.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया बऱ्याचदा सुकत घालून अनेक घरांमध्ये खाल्या जातात. बंगाल आणि बिहारमध्ये या राईच्या तेलात तळून त्याचे सेवन केले जाते. याचा फायदा हृदय, नसा आणि हाडांसाठी होतो.

तीळ

नैराश्य, ताणतणाव वाढणाऱ्या हार्मोन्सना कमी करण्यात तीळ उपयुक्त ठरतात. शरीराला आवश्यक असणाऱ्या स्निग्धतेचा पुरवठा करणारे हेच तीळ शरीरास घातक असणारे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासही त्यांची मदत होते.

First Published on: March 3, 2020 6:00 AM
Exit mobile version