‘या’ भाज्यांचे करा सालीसकट सेवन; सालीमध्ये असतात पौष्टिकतत्व

‘या’ भाज्यांचे करा सालीसकट सेवन; सालीमध्ये असतात पौष्टिकतत्व

आपल्याकडे दररोज भाज्या या खाल्ल्या जातात. यामुळे आपल्या शरीराला पोषण मिळते. तसेच डॉक्टरही भाज्या खाण्याचा सल्ला देतात. परंतु, बऱ्याचदा कोणत्या भाज्या या सालासकट खाव्यात ज्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. हे आपल्याला सहजासहजी कळत नाही. अशा काही भाज्या आहेत ज्याचे सालीसकट सेवन केल्याने पौष्टिकतत्व मिळते. चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या भाज्या आहेत.

बीट

बऱ्याचदा शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले का डॉक्टर बीट खाण्याचा सल्ला देतात. पण, अनेक जण बीटाची साल काढून त्याचे सेवन करतात. पण, असे न करता सालासकट बीट खावे. बीटामध्ये पोटॅशियम, लोह आणि जीवनसत्व सी मुबलक प्रमाणात असतात. बीटाच्या सालीने तुमची पनशक्ती सुधारते.

बटाटा

बटाट्याच्या सालीत तंतुमय पदार्थ, क्षार आणि जीवनसत्वे असतात. बटाट्याच्या सालीतून आपल्याला अनेक पोषक घटक मिळतात. ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्याने बटाटा सालीसहित खावा.

गाजर

गाजर सालासकट खावे, कारण गाजरात अनेक तंतुमय पदार्थ, जीवनसत्वे असतात. साल काढून टाकल्यामुळे गाजरात तितके पौष्टिक घटक राहत नाहीत.

काकडी

काकडीची साल बऱ्याच जणांना आवडत नाही. परंतु, काकडीच्या सालीत भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. साल काढल्यास हे पोषक घटक आपल्याला मिळत नाही.

First Published on: August 26, 2020 6:37 AM
Exit mobile version