व्हाईट ब्रेड खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

व्हाईट ब्रेड खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

व्हाईट ब्रेड खाल्ल्याने होऊ शकतात 'हे' आजार

एखाद्या व्यक्ती आपल्या दैनंदिन आयुष्यात सर्वात जास्त आपल्या आरोग्याकडे तसेच शरिराकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळते. असे बोलले जाते की व्यक्तीच्या आयुष्यात जर कोणी शेवट पर्यंत साथ देत असेल तर ते त्याचे शरिर आहे. परंतू अनेक माणसं बाजारपेठेत मिळणाऱ्या खराब,तेलकट,तूपकट,चरबीयुक्त हानीकारक पदार्थांचे सेवन करुन त्याला सातत्याने नूकसान पोहचवत असताता. आपल्या आजू-बाजूला ओरोग्यासाठी विनाशकारी असणाऱ्या स्लो-पॉईजन सारख्या पदार्थांचा भाडीमार आहे.त्यातीलच एक पदार्थ म्हणजे व्हाईट ब्रेड. भारत देशासहित जगभरात सकाळची सुरूवात ब्रेडने केली जाते. आणि हा व्हाईट ब्रेड सकाळच्या नाष्ट्याकरिता अत्यंत वाईट पर्याय आहे.जर तुम्ही रोज ब्रेडचे सेवन करत असाल तर आत्ताच हे थांबवणे गरजेचं आहे.आज आपण जाणून घेणार आहोत ब्रेडचं सेवन करणं शरिरासाठी हानिकारक.

ब्रेड बनवतांना पिठामधील सर्व पोषक तत्वे तसेच ऑइल काढून ब्लीच करण्यात येते ब्रेड जास्त काळ टिकावे यासाठी हा मार्ग अवलंबला जातो.यासोबतच ब्रेडच्या नैसर्गिक पिवळ्या रंगाला हटवण्यात यावे यासाठी पोटॅशियम ब्रोमेट, एज़ोडिकार्बोनामाइड, क्लोरीन डाइऑक्साइड गॅस सारख्या रसायनांचा वापर केला जातो. तसेच शरीराचे वजन वाढण्यास वाईट ब्रेड कारणीभूत आहे. यामध्ये फयबर सारख्या पोषक तत्वाचे प्रमाण वगळण्यात येते . यामुळे कदाचित तुम्हांला डायबिटीज,हृदय विकाराचा त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे अचानक ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. अशा स्थितीत थकवा जाणवू शकतो आणि त्यांची शारीरिक क्रिया संथ होते. यामुळे जास्त थकवा येतो आणि झोप देखील येते.



हे हि वाचा – Mask Up India:जाणून घ्या कोरोनाचा प्रसार रोखण्यास मास्क किती टक्के प्रभावित आहे?



 

First Published on: July 2, 2021 4:29 PM
Exit mobile version