Corona Treatment : कोरोना संसर्गादरम्यान व्यायाम करणे फायद्याचे? संशोधनातून खुलासा

Corona Treatment : कोरोना संसर्गादरम्यान व्यायाम करणे फायद्याचे?  संशोधनातून खुलासा

कोरोना संसर्गादरम्यान व्यायाम करणे फायद्याचे? संशोधनातून खुलासा

जगासह देशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक पाहायला मिळतोय. या विषाणूला रोखण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेत आहे. दरम्यान या घातक विषाणूपासून स्वत: चा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी व्यायाम किती महत्वाचा असतो याबाबत एक संशोधन करण्यात आले. या संशोधनात असे सिद्ध झाले की, दिवसभरात आपण ३० मिनिट, आठवड्यातून ५ दिवस १५० मिनिटे जर तुम्ही जर नियमित व्यायाम केलात तर तुम्हाला कोरोनादरम्यान होणाऱ्या श्वसनाचा त्रासापासून बचाव करता येणार आहे.

त्यामुळे कोरोनपासून दूर राहण्यासाठी व्यायाम, योगा, प्राणायाम मदत करेल. कोरोनातून बरे झाल्यानंतरही श्वसन संस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी रोज किमान १ तास तरी व्यायाम करावा. या संशोधनात असेही सांगण्यात आले की, कोरोनाच्या मुक्तीनंतर पुरेशी झोप घ्यावी तसेच पौष्टिक आहार सुद्धा रुग्णांनी घ्यावा व तणावमुक्त रहावे असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो आहे. कोरोना झालेल्या रुग्णांना योगासन महत्त्वाचे आहे.यामुळे श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो.

स्नायू मजबूत होण्यास मदत होते तसेच मानसिक ताणही सुद्धा कमी होतो. कोरोनातून बरे होऊनही तीन महिन्यानंतर एखाद्या शहरातील अँटीबॉडीज नाहीशा होऊ शकतात अशा व्यक्ती जर बाधितांच्या संपर्कात आल्या तर त्यांना पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते.त्यामुळे कोरोना होण्यापासून वाचण्यासाठी सायकलिंग, रेसिंग, प्राणायमसारखे व्यायाम नियमित करा. यामुळे कोरोनाची लस तुमच्या शरीरावर ४० टक्के प्रभावी ठरु शकते.


 

First Published on: April 28, 2021 12:14 PM
Exit mobile version