पावसाळ्यात होऊ शकतो डोळ्यांना व्हायरस

पावसाळ्यात होऊ शकतो डोळ्यांना व्हायरस

प्रातिनिधिक फोटो

पावसाळा हा प्रत्येकाचा आवडता ऋतू. पाऊस आला की, सर्वांच्याच चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद मिळतो. पण पावसाळ्याबरोबरच येतात ते व्हायरस आणि वेगवेगळे बॅक्टेरिया. पावसातून आलेल्या व्हायरसमुळं सर्वात पहिला त्रास होणारा माणसाचा अवयव म्हणजे डोळा. डोळ्या येण्यासारख्या अनेक साथी पावसाळ्यातच होतात. त्यामुळं पावसात डोळ्यांची काळजी कशी घेण्यात यावी यासंदर्भात आपण जाणून घेऊया.

१. नेहमी आपल्या डोळ्यांजवळ लागणारे कपडे हे आपल्या हाताने स्वच्छ धुवावे. आपला टॉवेल, चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स इत्यादी सामान इतर कोणाहीबरोबर शेअर करू नये. बाहेर जाताना नेहमीच उन्हात गॉगल अथवा आपल्या चष्मा वापरावा. आपल्या डोळ्यांमध्ये बाहेरील व्हायरस जाण्यापासून संरक्षण होतं.

२. आपल्या डोळ्यांचा इलाज अतिशय सावधानतेनं करावा. रोज थंड पाण्यानं आपले डोळे धुवावे. सकाळी उठल्यानंतर वा कॉन्टॅक्ट लेन्स काढल्यानंतर आपले डोळे जोरजोरात चोळू नयेत. कारण यामुळं कॉर्नियाला नुकसान पोहचण्याची शक्यता असते.

३. पावसाळ्यादरम्यान कॉन्टॅक्ट लेन्स शक्यतो वापरू नये. कारण डोळ्यांना यामुळं त्रास होतो. यामुळं डोळे सतत लाल राहतात आणि डोळ्यात जळजळ होत राहते. तर चष्मा असणाऱ्यांनी आपला चष्मा नेहमी स्वच्छ आणि सुका ठेवावा.

४. जास्त पाणी साचणाऱ्या क्षेत्रात जाऊ नये. या ठिकाणी जास्त व्हायरस, बॅक्टेरिया आणि फंगस पावसाळ्यात होतात जे अगदी सहज संक्रमित होतात आणि आपल्याला नुकसान पोहचवू शकतात.

५. कोणत्याही व्हायरसपासून संरक्षण मिळवण्यासाठी शरीराचं आरोग्य आणि प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य आणि संतुलित आहार घेणं जास्त महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात बाहेरचे रस्त्यावरील उघडे पदार्थ खाणं टाळा.

६. साधारण पावसाळ्यात होणारे आजार हे अतिशय हानिकारक असतात. तर डोळ्यांना सर्वात जास्त आणि लवकर नुकसान पोहोचतं. यामध्ये डोळे येणं, आय फ्लू, कॉर्नियल अल्सर हे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळं जास्तीत जास्त स्वच्छ राहून काळजी घ्यावी.

First Published on: August 8, 2018 12:10 PM
Exit mobile version