Saturday, May 18, 2024
घरमानिनीFashionतुम्हाला हाय हिल्स आवडतात? मग या व्हरायटी नक्की ट्राय करा?

तुम्हाला हाय हिल्स आवडतात? मग या व्हरायटी नक्की ट्राय करा?

Subscribe

हाय हिल्स घालणे महिलांना फार आवडते. काही महिला हाय हिल्स घातल्यानंतर खुप कंम्फर्टेबलपणे चालू शकतात. अशातच सध्या हाय हिल्स घालण्याचा ट्रेंन्ड सुरु असल्याने मार्केटमध्ये विविध डिझाइन आणि हिल्सच्या साइजनुसार त्या तुम्हाला खरेदी करता येतात.

सिल्टोज

- Advertisement -


हाय हिल्स खुप आवडत असतील तर तुम्ही सिल्टोज घालू शकता. या हिल्स पुढील बाजूस निमूळते आणि बारीक असतात. मात्र ते घालणे काहीजणांना मुश्किल होते. पण घातल्यानंतर एक स्टेटमेंट लूक देतात. अशा प्रकारचे हिल्स तुम्ही नाइट पार्टीजसाठी घालू शकता.

पम्प्स

- Advertisement -


सिल्टोजच्या तुलनेत पम्प्स थोडे उंच असतात. मात्र चालताना तुम्हाला आरामदायी वाटते. हे हिल्स पूर्णपणे पायाला कवर करतात. असे हिल्स खरेदी करायचे असतील तर ब्लॅक किंवा न्यूड रंगामध्ये खरेदी करु शकता.

ब्लॉक हिल्स


जर तुम्हाला कंम्फर्टेबल आणि चालण्यासाठी आरामदायी हिल्स पाहत असाल तर ब्लॉक हिल्सचा पर्याय निवडू शकता. हे हिल्स सिल्टोज आणि पम्प्सच्या तुलनेच अधिक रुंद असतात. यामुळे तुमचे पोश्चर स्थिर ठेवण्यास मदत करतात. तुम्ही स्लेन्डर बेस किंवा फुल वेज किंवा म्यूल्सची निवड करु शकता.

प्लॅटफॉर्म हिल्स


हे हिल्स तुम्ही दररोज घालू शकत नाहीत. मात्र पार्टीजसाठी अशा प्रकारचे हिल्स एकदम परफेक्ट आहेत.

किटन हिल्स


किटन हिल्स अशा तरुणींसाठी आहेत ज्यांना अधिक हिल्स घालणे आवडत नाही. हे अगदी आरामदायी असतात. तुम्ही असे हिल्स दररोज ही घालू शकता.

एस्पाड्रिल्स


हे कॅज्युअल, रोप-सॉलिड शूज किंवा फ्लॅट असतात अथवा हाय-हिल्स सुद्धा असतात. ज्यांना खुप कॅज्युअल लूक कॅरी करायचा असेल त्यांनी एस्पाड्रिल्स खरेदी करु शकता.


हेही वाचा- ऑफिस असो किंवा पार्टी carry करा ‘या’ बॅग्स…

- Advertisment -

Manini