कडक उन्हाळ्यात दिसा फॅशनेबल

कडक उन्हाळ्यात दिसा फॅशनेबल

फॅशनेबल

योग्य रंगसंगती, दागिने आदींची निवड करून उन्हाळ्याच्या दिवसातही आपण फॅशनेबल दिसू शकतो. त्यासाठी आवश्यक टिप्स पुढीलप्रमाणे…

१) उन्हाळ्यात नेहमी आपल्या कपाटात पांढर्‍या रंगाचे कपडे जरूर ठेवा. या दिवसात शॉर्ट ड्रेस, मॅक्सी ड्रेस, लखनवी सूट, अनारकली, साडी, शर्ट, पेन्सिल स्कर्ट, ट्राऊजर प्रकारच्या कपड्यांना प्राधान्य असू द्या. उन्हाळ्याच्या दिवसात घट्ट कपड्यांऐवजी सैलसर कपड्यांचा वापर करावा. शॉर्ट ड्रेस, मॅक्सी ड्रेस, सूती टी-शर्ट, पॅलेझो, लांब कुर्ती, पांढरे शर्ट किंवा लिनेन जाकीट, सूती साडी इत्यादी पर्याय या दिवसात उत्कृष्ट ठरतात.

२) उन्हाळ्यात ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनची फॅशनमध्ये चलती आहे. तेव्हा या कॉम्बिनेशनचा फॅशन मध्ये जरूर विचार करावा. तसेच पांढर्‍या रंगासह गुलाबी, पिवळा, नारंगी, लैव्हेंडर, ऑलिव्ह हिरवा रंगदेखील उठून दिसतो. तेव्हा पांढर्‍या रंगासह वरील कोणत्याही रंगाच्या कॉम्बिनेशनची उन्हाळ्याच्या दिवसात निवड करावी. उन्हाळ्यासाठी कपड्यांवरील प्रिंट निवडताना फ्लोरल प्रिंटला प्राधान्य द्या. कारण उन्हाळ्यात फ्लोरल प्रिंट खूप सुंदर दिसते. याशिवाय, चेक्स, पट्टे, भौमितीय प्रिंटदेखील उन्हाळ्याच्या दिवसात ट्राय केले जाऊ शकतात.

३) या दिवसात संध्याकाळी पार्टीसाठी जाताना शिफॉन, जॉर्जेट, रेशीमच्या शॉर्ट ड्रेसचा पर्याय उत्तम ठरतो. त्यातही वन शोल्डर, ऑफ शोल्डर किंवा मॅक्सि ड्रेस खुलून दिसतात. तसेच गोल्डप्रमाणे सिल्वर कलरही संध्याकाळच्या पार्टी वेअरमध्ये उत्तम पर्याय ठरतो.

४) या दिवसात लग्न समारंभाला जाताना गोल्ड किंवा सिल्वर कलर्सना प्राधान्य देऊ शकता. याशिवाय, ऑलिव्ह ग्रीन, गुलाबी, पीच सारख्या पेस्टल कलर्समधील अनारकली, लेहंगा-चोली, पारंपरिक गाउन किंवा साडीदेखील लग्नसमारंभासाठी चांगले पर्याय ठरतात.

५) या दिवसात आपण आपली स्वत:ची स्टाईल तयार करू इच्छित असल्यास लेयरिंगचा पर्याय निवडा. आपल्या नियमित वापरातील कुर्ता, टॉप, टी-शर्ट, शर्ट, जीन्स, पॅलेझो, स्कर्ट इ.सह स्टॉल, स्कार्फ, कॉटन जॅकेटचा वापर तुम्हाला सर्वात वेगळा आणि स्टाइलिश लुक देऊन जातो.

First Published on: April 28, 2019 4:49 AM
Exit mobile version