दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी करा ‘हे’ पाच उपाय

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी करा ‘हे’ पाच उपाय

सफेद दातासाठी काय करावे उपाय

सौंदर्यामध्ये भर घालतं ते म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं हसू आणि हसल्यानंतर सर्वप्रथम दिसतात ते दात. सफेद दात तुमची सुंदरता आणि व्यक्तीमत्त्वाला ओळख मिळवून देतात. चमकदार आणि मजबूत दात टिकवण्यासाठी दिवसातून दोन वेळा ब्रश करून आणि व्यवस्थित निगा राखून मजबूत ठेवता येतात. पान, तंबाखू यासारख्या गोष्टी दातांची शुभ्रता कमी करतात. तुम्ही जर पिवळेपणापासून त्रस्त असाल तर करा ‘हे’ पाच उपाय

१) तुळस – दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुळस हा चांगला पर्याय आहे. तुळस तोंड आणि दातांच्या रोगांपासून दूर ठेवायला उपयोगी आहे. त्यामुळे तोंडाला वास येत नाही. तुळशीच्या पानाची पावडर करून ती टूथपेस्टमध्ये मिसळून दाताला लावल्यास दाताचा पिवळसरपणा नाहीसा होतो.

तुळस

२) मीठ – मीठ हा पदार्थ पूर्वीपासून दातांच्या स्वच्छतेसाठी वापरला गेला आहे. अगदी दातदुखी होत असल्यासदेखील मिठाच्या पाण्याने चुळा भरल्या जातात. मिठामध्ये २ ते ३ थेंब मोहरीचे तेल मिसळून दात घासल्यास, दात चमकायला लागतात.

मीठ

३) संत्र्याचं साल – संत्र्यामध्ये व्हिटामिन सी असते, जे दातासाठी पोषक असते. संत्र्याचं साल आणि तुळशीची पानं सुकवून त्याची पावडर करावी. ब्रश केल्यानंतर रोज या पावडरने दोन मिनिटं दातावर घासत मसाज केल्यास दाताचा पिवळसरपणा कमी होऊन चमकू लागतात.

संत्र्याचं साल

 

 

 

 

४) बेकिंग सोडा – बेकिंग सोडा हा सर्वात सोपा घरगुती उपाय आहे. ब्रश केल्यानंतर थोडासा बेकिंग सोडा घेऊन दात साफ केल्याने दात पांढरे राहण्यास मदत होते. तसेच बेकिंग सोडा आणि मीठ टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश केल्यास दात स्वच्छ होतात.

बेकिंग सोडा

५) लिंबाचा रस – एका लिंबाचा रस काढून त्याचप्रमाणात त्यामध्ये पाणी मिसळून घ्यायचं. खाऊन झाल्यानंतर या पाण्याने गुळण्या कराव्यात. हा उपाय रोज केल्यास दात स्वच्छ तर होतातच, शिवाय श्वासाची दुर्गंधीदेखील निघून जाते.

लिंबाचा रस
First Published on: May 25, 2018 10:35 AM
Exit mobile version