व्हाइट शूज साफ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

व्हाइट शूज साफ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

कोणत्याही रंगाच्या ड्रेसवर सहज मॅच होणारे व्हाइट शूज प्रत्येकाकडे असतातच, ट्रेंन्डी व्हाइट शूज सगळेचजण आवडीने घालतात. बॉलिवूड कलाकारांना देखील आपण अनेकदा व्हाइट स्नीकर्स किंवा शूजमध्ये पाहतो. परंतु, हे पांढरे शूज सतत वापरल्याने खूप खराब होतात. अशावेळी ते स्वच्छ कसे करावे याची चिंता आपल्याला सतावते.

असे स्वच्छ करा व्हाइट शूज

 

लिंबाच्या रसामध्ये साइट्रिक अॅसिड असते जे शूज स्वच्छ करण्यासाठी नक्कीच तुमच्या कामी येईल. लिंबाच्या रसाचा वापर करून शूज स्वच्छ केले तर दुर्गंधी देखील दूर होते.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करून तुम्ही शूज स्वच्छ करू शकता. यामुळे दुर्गंध आणि फंगसची ग्रोथ रोखली जाते. मात्र, हे मिश्रण लेदर, रेग्झिनपासून तयार करण्यात आलेल्या शूजसाठी न वापरता कपड्याच्या शूजसाठीच वापरावे.

आपण टुथपेस्ट दात स्वच्छ करण्यासाठी वापरतो. मात्र पांढरे शूज स्वच्छ करायचे असतील तर तुम्ही टुथपेस्ट वापरू शकता.

नेल पेंट रिमूवरचा वापर करून तुम्ही पांढऱ्या रंगाचे शूज स्वच्छ करू शकता. यासाठी कॉटन बॉलवर एसीटोन रिमूवरचे काही थेंब टाका आणि ते डाग लागले आहेत तेथे स्वच्छ करा. डाग काढल्यानंतर त्यावर पावडर अथवा पेट्रोलियम जेलीचा वापर करा.


हेही वाचा :

टाईट जीन्सचे वाईट परिणाम

First Published on: April 14, 2024 11:52 AM
Exit mobile version