निरोगी राहण्यासाठी ‘या’ गोष्टी टाळा

निरोगी राहण्यासाठी ‘या’ गोष्टी टाळा

निरोगी राहण्यासाठी 'या' गोष्टी टाळा

बऱ्याचदा काही सवयींमुळे आपण आजारपणांना निमंत्रण देतो. अशा काही गोष्टी आहेत. ज्या टाळल्यास आजार दूर राहतात.

१. उशीरा झोपणे उशीरा उठणे.
२. दुपारी खुप वेळ झोपणे.
३. व्यायामाचा अभाव.
४. मोकळ्या हवेत न फिरणे.
५. शरिराला जरा सुद्धा कोवळे ऊन लागू न देणे.
६. अतिरिक्त क्लोरिन युक्त पाणी पिणे.
७. हातगाडे, हाँटेलमधील आणि घरी वारंवार तेलकट तिखट पदार्थ खाणे.
८. शिळे अन्न खाणे.
९. व्यसने
१०. दुषित हवा.
११. दिवसभर एकाच जागेवर बसून बैठी कामे करणे.
१२. कामाचा अतिरिक्त ताण घेणे.
१३. गोगांटात किंवा प्रचंड आवाजात राहणे.
१४. शारीरीक स्वच्छतेचा अभाव.
१५. घरातील आणि परिसरातील अस्वच्छता.
१६. डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनानेच मेडीकल मधील गोळ्या खाणे.
१७. शांततेने न जेवणे.
१८. उभे राहुन पाणी पिणे किंवा पदार्थ खाणे.
१९. बेकरीचे पदार्थ खाणे.
२०. सतत नॉनव्हेज खाणे.
२१. प्लास्टीक पिशवतील विविध पदार्थ खाणे.
२२. कोल्ड्रिंक्स पिणे.
२३. दात न घासणे.
२४. एकच ड्रेस, रुमाल इ. कपडे एका दिवसापेक्षा जास्त वापरणे.
२५. आहारात फळांचा समावेश नसणे.
२६. दुध न पिणे.
२७. अँल्युमिनीयमच्या भांड्यातील स्वयंपाक खाणे.
२८. फ्रिजमधील पाणी पिणे.
२९. आहारात मीठ भरपुर खाणे.

First Published on: December 15, 2019 6:30 AM
Exit mobile version