मुलांना घडवणारे 4 गोल्डन रुल्स

मुलांना घडवणारे 4 गोल्डन रुल्स

मुलं ही मातीच्या ढेकळासारखी असतात त्यांना घडवाल तशी ती घडतात असं नेहमी बोललं जातं. याचं कारणच असं आहे की मुलं नाजूक मनाची असतात. यामुळे मुलांना घडवताना ४ गोल्डन रुल्स  पालकांनी पाळावेत. कोणते आहेत हे मंत्र ते बघूया.

नम्रता

नम्रपणे व्यक्त होणे हे दया किंवा दुर्बलतेचे लक्षण नाही तर आपल्या आंतरिक सामर्थ्याचे लक्षण आहे. एखाद्यावरील संस्कार जर ओळखायचे असतील तर ते त्या व्यक्तीच्या नम्रतेवरून दिसून येते. यामुळे मुलांना मोठ्यांशी नम्रपणे कसे बोलायचे हे पालकांनी शिकवायला हवे.

कृतज्ञता

पालकांनी मुलांना कृतज्ञता शिकवावी. कृतज्ञता म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आभार व्यक्त करणे. कारण हल्लीच्या पिढीला कृतज्ञता व्यक्त करणं कमीपणाचे वाटते. यामुळे बऱ्याचवेळा अहंपणामुळे अशी मुलं मागे पडतात. त्यामुळे मुलांना नम्रतेबरोबरच कृतज्ञता व्यक्त करणे सोपे जाते.

चुका मान्य करणे

खरा धाडसी माणूस तोच असतो जो चूक झाल्यावर समोरच्याची माफी मागतो आणि आपली चूक लक्षात घेतो. आपण चुका टाळू शकत नाही, परंतु चूक स्वीकारणे, त्यातून शिकणे आणि तीच चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे. हे सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे आपली चूक मान्य करणे म्हणजेच सॉरी म्हणणे. हे मुलांना शिकवावे.

माफी
ज्या व्यक्तीमध्ये दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता असते ती व्यक्ती मोठी होते. यामुळे मुलांना माफ करण्याचे महत्व सांगावे. जेणेकरून भविष्यातजर त्याचे कोणाशी मतभेद झाले तर त्याच्याबद्दल कायमचा राग न बाळगता त्याला माफ करणे मुलाला सहज शक्य होईल. कारम बऱ्याचेवळा व्यकती अपमानाच्या आगीत जळत राहते.आणि स्वत:चे नुकसान करून घेते.

First Published on: April 30, 2024 7:12 PM
Exit mobile version