मैत्री करताना काय काळजी घ्याल?

मैत्री करताना काय काळजी घ्याल?

हल्लीच्या आधुनिक जगात सोशल मीडियामुळे मैत्री करणं खूप सोपं झालं आहे. सध्याच्या हेक्टीक लाईफमुळे प्रत्येकाला गरज आहे ती त्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीची. त्याला अडचणीत मार्ग दाखवणाऱ्या, मदत करणाऱ्या मित्र मैत्रिणीची. ज्याच्यासोमर तुम्ही मन मोकळं करू शकतात अशा सच्च्या मित्रमैत्रिणीची. पण बऱ्याचवेळा मैत्रीमध्ये गफलत होते. चुकीच्या व्यक्तीबरोबर मैत्री केल्याने पुढे मनस्ताप होऊ शकतो. यामुळे मित्र मैत्रीणी निवडताना काळजी घेणे आवश्यक आहे.

त्यातही जर तुम्ही महिला असाल तर पुरुषाबरोबर मैत्री करताना सावध राहा. कारण वाईट मानसिकता असलेल्या व्यक्तीबरोबर मैत्री करून पुढे डोकेदुखी वाढू शकते. यासाठी काय करावे आणि काय टाळावे ते समजणे आवशयक आहे.

असे मित्र टाळावे
-तुमच्या अडचणीच्या काळात तुमचा आत्मविश्वास वाढवण्याऐवजी तुमचा आत्मविश्वास कसा डळमळीत होईल यावर बोलणारे

-सतत दुसऱ्यांची निंदा करणाऱ्या व्यक्तींपासून लांब राहावे. कारण अशा व्यक्ती तुमचीही निंदा इतरांसमोर करू शकतात.

-तुम्हांला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यापासून दोन हात लांब राहावे.

-अतिकौतुक करणाऱ्या व्यक्ती या नेहमीच धोकादायक असतात. कारण कौतुक करुन तुमचं मन जिंकणे आणि नंतर विश्वास जिंकणे हाच त्यांचा प्लान असतो.

-समोरची व्यक्ती जर तुमच्याकडून सतत पैशांची मागणी करत असेल तर तिच्यापासून लांब राहावे.

-तुमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्यांना लांब ठेवावे.

या व्यतिरिक्त सर्वच मित्र-मैत्रीणींना आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी सांगणे गरजेचे नसते. कारण यामुळे तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतोच. पण तुमचे महत्व सुद्धा त्यांच्या नजरेत कमी होते. त्यामुळे लक्षात ठेवा असे काही मित्र निवडा जे तुमच्या कामी येतीलच पण त्यांच्यासह तुमचा ही त्यांच्यावर विश्वास असावा.


हेही वाचा: आयुष्यात मित्रपरिवार हवाच, पण…

First Published on: April 19, 2023 4:53 PM
Exit mobile version