‘ग्रेप्स’ आईस्क्रीम

‘ग्रेप्स’ आईस्क्रीम

'ग्रेप्स' आईस्क्रीम

आईस्क्रीम खाणे कोणाला आवडत नाही. मग कोणताही ऋतू असो अगदी पावसाळा असला तरी अनेकांच्या आईस्क्रीम म्हटलं का तोंडाला पाणी सुटतमात्र, बऱ्याचदा बाजारातील आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरच्या घरी तयार केलेले आईस्क्रीम खाण्यात एक वेगळीच मज्जा असते. चला तर जाणून घेऊया घरच्या घरी ग्रेप्सआईस्क्रीमची रेसिपी

साहित्य :

५०० ग्रॅम द्राक्षे

५०० ग्रॅम दही

एक कप साखर

अर्धा कप दुधाची पावडर

अर्ध्या लिंबाचा रस

पाव कप क्रिम

कृती :

प्रथम द्राक्षे धुऊन मिक्सरमधून पल्प तयार करुन तो गाळून घ्या. त्यानंतर दही पातळ कपड्यात बांधून दोन तास टांगून ठेवा. पाणी निथळून गेलेले दही कपड्यातून काढा आणि त्यात पिठीसाखर, दुधाची पावडर, लिंबाचा रस आणि द्राक्षांचा पल्प घालून सेट होण्यस ठेवा. तासांनी अर्धवट झालेले आइस्क्रीम बाहेर काढा आणि मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा आईस्क्रीम सेट होण्यास ठेवा आणि सर्व्ह करताना द्राक्षे लावून ते सजवा. अशाप्रकारे घरच्या घरी ग्रेप्सआईस्क्रीम सहज तयार करुन शकता.

First Published on: June 27, 2019 6:00 AM
Exit mobile version