Green Pea Cucumber Soup: थंडीत प्या हिरवा वाटाणा आणि काकडीचं पौष्टीक सूप

हिवाळा सुरू झाला की बाजारात हिरव्या पालेभाज्यांबरोबरच फळभाज्या मोठ्या प्रमाणावर सहज उपलब्ध होतात. पौष्टीक घटक असलेल्या या भाज्यांमध्ये हिरवा वाटाणा हा सर्वांच्या आवडीचा आहे. प्रोटीन्स भरपूर असलेल्या या हिरव्या वाटाण्याचे आणि काकडीचे सूपही बनवता येते.

हिरव्या वाटाण्यात अँटीऑक्सीडेंट, फायबर, प्रोटीन्स तर असतेच. तसेच यातील मॅग्निशियममुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. यामुळे आरोग्यवर्धक हिरवा वाटाणा आणि फायबरने परिपूर्ण असलेल्या काकडीचे सूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

साहीत्य
१ मध्यम आकाराची बारीक चिरलेली काकडी, १ कप हिरवा वाटाणा दाणे, १ कप बारीक चिरलेला पातीचा कांदा, ४ कप भाज्यांचे सूप( वेजिटेबल स्टॉक) २ चमचे दही, १ चमचा ऑलिव्ह ऑईल, १ चमचा काळी मिरी पावडर, १ चमचा रेड चिली सॉस, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी

कृती-सर्वप्रथम मध्यम आचेवर एका पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. त्यात कांदा लालसर परतून घ्या. नंतर काकडी, वाटाणा नरम होईपर्यंत शिजल्यानंतर त्यात वेजिटेबल स्टॉक टाका. उकळी येईपर्यंत गरम करा. त्यानंतर त्यात काळी मिरी पावडर, मीठ टाका. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करा. ही पेस्ट एका बाऊलमध्ये ओता. त्यावर पाव चमचा दही रेड सॉस टाका आणि गरम सर्व्ह करा.

First Published on: January 24, 2022 5:31 PM
Exit mobile version