टीव्हीमुळे उडते झोप!

टीव्हीमुळे उडते झोप!

प्रातिनिधिक फोटो

झोप प्रत्येक माणसाच्या आरोग्यासाठी खूपच आवश्यक असते. रोजची बिघडलेली दिनचर्या आणि बिघडलेल्या सवयी यामध्ये झोप ही सध्या प्रत्येकाच्याच आयुष्यात समस्या बनली आहे. त्यात सध्या मोबाईल आणि टीव्हीमुळं झोपेची समस्या जास्त उद्भवली आहे. याकडे हल्ली दुर्लक्ष केलं जातं, जी योग्य गोष्ट नाही. झोप न झाल्यामुळं हळूहळू चिडचिड, रक्तदाब आणि तणावाच्या समस्येलादेखील आमंत्रण मिळतं. त्यामुळं रूग्णालयाच्या फेऱ्या वाढतात. वास्तविक हे त्रास कमी झोपेमुळंच सुरु होतात. यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे टीव्ही बघण्याची सवय. टीव्ही बघत राहिल्यामुळं झोपेची समस्या उद्भवते हे वैज्ञानिकदृष्ट्यादेखील सिद्ध झालं आहे. जाणून घेऊया कसा परिणाम होतो?

टीव्ही पाहण्याचा कसा होतो झोपेवर परिणाम?

चांगल्या झोपेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं डोकं पूर्ण तऱ्हेनं शांत राहणं गरजेचं आहे. जसं डोकं शांत होत जातं तसं माणूस झोपेच्या अधीन होतं. पण बरेच लोक झोपण्यापूर्वी टीव्ही बघतात. टीव्हीवर अनेक सामाजिक मुद्दे असणारे वा गुन्ह्याशी संबंधित शोदेखील दाखवले जातात. त्याशिवाय अन्य बाबींवर आधारित मालिकादेखील चालू असतात. त्यामुळं त्या मालिका बघितल्यानंतर पुन्हा डोक्यातील विचारचक्र सुरु होते. त्यामुळं डोकं शांत होण्याऐवजी पुन्हा धावायला लागतं. तर झोप येत असतानाही झोपण्यापूर्वी बरेच जण मोबाईल स्क्रोल करायला सुरुवात करतात. त्यामुळं सर्व परिणाम झोपेवर होऊन झोप उडते.

चांगली झोप हवी असल्यास, काय करावे?

– झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी टीव्ही बंद करावा
– संध्याकाळीदेखील मानसिक अशांतता निर्माण करणाऱ्या मालिका पाहू नयेत
– बेडरूममधील लाईट पूर्ण बंद करून टीव्ही पाहणं योग्य नाही
– टीव्ही पाहताना थोडा तरी उजेड असणं गरजेचं आहे
– झोपण्यापूर्वी अर्धा तास बेडरूमचा लाईट अतिशय मंद असू द्यावा
– आपल्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टींकडे झोपण्यापूर्वी लक्ष द्यावं वा विचार करावा
– यामध्ये योग, संगीत ऐकणं, आपल्या आवडीचं वाचन करणं याचा समावेश करता येईल
– रात्रीचं जेवण झाल्यानंतर लगेच बेडवर झोपू नये आणि खुर्चीतदेखील बसू नये, थोड्या फेऱ्या माराव्या
– झोपण्यापूर्वीचा काही वेळ हा चालण्यासाठी वापरावा, ज्यामुळं शांत झोप लागते

First Published on: August 10, 2018 11:21 AM
Exit mobile version