बिनधास्त करा ‘लस्सी’चे सेवन

बिनधास्त करा ‘लस्सी’चे सेवन

बिनधास्त करा 'लस्सी'चे सेवन

बऱ्याच जणांना उन्हाळ्यात थंडगार सेवन करावेसे वाटत असते. त्यामुळे बरेच जण ऊसाचा रस, ज्यूस, कोकम सरबत, ताक किंवा थंडगार लस्सी याचे सेवन करतात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि थकवा दूर होण्यास मदत होते. मात्र, यातील गारेगार लस्सी फक्त थंडावाच देत नाही तर इतर समस्यांवर देखील फायदेशीर आहे.

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्यांनी लस्सीचे सेवन करावे. यामुळे पोटॅशिअम आणि राइबोफ्लेविन तत्त्व उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

पोटाचे विकार

लस्सी पिण्याचा सर्वांत मोठा फायदा पोटासाठी होतो. पोटाच्या संबंधित असलेले सर्व विकार लस्सीमुळे दूर होतात. फूड पॉइझनिंग सारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी असते.

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते

दह्यातील प्रोबायोटिक गुण शरीरातले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. लस्सी प्यायल्याने मेटाबॉलिजम वाढते.

पचनक्रिया उत्तम राहते

लस्सीच्या सेवनाने जेवण पचवण्यासाठी मदत होते.

हाडे मजबूत होतात

दूध न पिणाऱ्यामध्ये नेहमी कॅल्शियमची कमी जाणवते. त्यामुळे दुधाऐवजी लस्सी एक चांगला पर्याय आहे. लस्सीमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतात. तसेच, कॅल्शियमही मिळते. लस्सीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडेदेखील मजबूत होतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

लस्सीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच लस्सीमध्ये असलेल्या लॅक्टिक अॅसिड आणि व्हिटॅमिन डीमुळे इम्युनिटी पॉवर वाढण्यास मदत होते.

केसांच्या आरोग्यासाठी उत्तम उपाय

लस्सीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी १२ केसांना पांढरे होण्यापासून वाचवते. तसेच, लस्सीचा केसांच्या कंडिशनिंगसाठीही वापर केला जाऊ शकतो.

First Published on: May 26, 2020 6:10 AM
Exit mobile version