कारले खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

कारले खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

कारले खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

कारलं म्हटलं की, अनेक जण नाक मुरडतात. परंतु चवीने कडू असलेले कारले शरीरासाठी उत्तम असते. विशेष म्हणजे कारले लहान मुलांनी खाव यासाठी गृहिणी वेगवेगळ्या युक्त्या देखील लढवतात. मात्र, असे केल्याने बऱ्याचदा त्या काऱ्यामधील भाजीतील जीवनसत्त्व पूर्णपणे वाया जाते. त्यामुळे नावडत कारल आठवड्यातून एकदा तरी खावे, कारण ते शरीरासाठी उत्तम असते. चला तर जाणून घेऊया. कारले खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

रक्तशुद्धी

कारल्याच्या रसामुळे रक्तशुद्धी होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा विकार देखील दूर होण्यास मदत होते.

कावीळ

बऱ्याचदा कावीळ झाल्यास ती दूर व्हावी याकरता घरगुती उपाय केले जातात. अशावेळी कारले देखील उत्तम उपाय आहे. कावीळ झाल्यानंतर ताज्या कारल्याचा रस काढून तो सकाळ, संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होते.

यकृताचे विकार

यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारले एक रामबाण उपाय आहे. यामुळे यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्यचा रस फायदेशीर ठरतो.

जंत

लहान मुलांना जंताचा त्रास बऱ्याचदा होण्याची तक्रार असते. अशावेळी पोटात जंत झाल्यास कारल्याचा रस फायदेशीर ठरतो.

सर्दी, खोकला

बऱ्याचदा हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि दम्याचा त्रास चाळवतो. अशावेळी कारल्याचा रस आणि तुळशीच्या पानांचा रस एकत्र करुन त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

First Published on: December 26, 2019 6:30 AM
Exit mobile version