झोपायच्या अगोदर नक्की खा ‘लवंग’

झोपायच्या अगोदर नक्की खा ‘लवंग’

झोपायच्या अगोदर नक्की खा 'लवंग'

अन्नातील चव वाढवण्यासाठी लवंगाचा वापर केला जातो. लवंगामध्ये अनेक महत्त्वपूर्ण असे गुणधर्म आहेत. जखमेसाठी एंटीसेप्टिक म्हणून जुन्या काळापासून लवंगाच्या तेलाचा वापर केला जातो. आपले आरोग्य निरोगी ठेवू शकेल, असे बरेच गुणधर्म लवंगामध्ये आहेत. चला तर जाणून घेऊया लवंगाचे आरोग्यदायी फायदे.

पोटदुखी

बऱ्याच जणांना पोटदुखीचा त्रास असतो. पाचक शक्ती जर कमकुवत असेल तर त्या व्यक्तीच्या पोटात दुखते. अशावेळी झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत दोन लवंग घेतल्याने आराम मिळतो.

डोकेदुखी

जर तुमचे डोके दुखत असेल तर पेन किलर घेण्याऐवजी एक लवंग घेऊन त्यावर कोमट पाणी घ्यावे. यामुळे डोकेदुखी त्वरित थांबते.

घसा खवखवणे

बऱ्याचदा तेलकट काही खाल्ल्यास घसा खवखवण्याची समस्या उद्भवते, अशावेळी तोंडात एक लवंग घोळवत ठेवा. यामुळे घसा खवखवण्याची समस्या दूर होते.

मुरुम

चेहऱ्यावर मुरुम असल्यास चेहऱ्यावर लावण्यात येणाऱ्या फेसॅकमध्ये लवंग तेलाचे दोन थेंब टाका. यामुळे मुरुम जाण्यास मदत होते.

दातदुखी

दंतदुखीमध्ये लवंगाचा वापर केला जातो. दातदुखीमध्ये लवंग चघळल्यामुळे आराम मिळतो. हिरड्या सुजल्या असतील तर लवंग तेलाने हलक्या हाताने मालिश करा.

First Published on: September 16, 2020 6:45 AM
Exit mobile version