हसत रहा; हसवत रहा! का जाणून घ्या

हसत रहा; हसवत रहा! का जाणून घ्या

जाणून घ्या हसण्याचे फायदे

आनंदी राहायचे असेल तर हसत रहा आणि समोरच्या व्यक्तीलाही हसवत रहा. हसणे ही एक अशी क्रिया आहे जी दोन अनोलखी लोकांना सुद्धा चटकन एकत्र आणू शकते. विशेष म्हणजे रस्त्यानी चालत जाताना देखील एखाद्या अनोळखी व्यक्तीला स्माईल दिली तरी समोरच्या व्यक्तीचा दिवस चांगला जातो. चला तर जाणून घेऊया हसण्याचे अजून कोणते कोणते फायदे आहेत जाणून घेऊया.

स्ट्रेस कमी होतो

शरीरातल्या काही हार्मोन्समुळे बऱ्याचदा स्ट्रेस येतो. तर काही हार्मोन्समुळे आनंदी देखील वाटते. पण, तुम्ही सातत्याने हसत रहाल तर तुमचा स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. तसेच तुमचे टेन्शन देखील कमी होते.

एक उत्तम व्यायाम

बऱ्याचदा आपण हसल्यामुळे आपल्या गालांचा आणि तोंडाचा उत्तम व्यायाम होतो. तसेच खूप जोरात मनापासून हसल्यावर आपल्या पोटातल्या स्नायूंचा आणि बरगड्यांचा देखील चांगला व्यायाम होतो. हसल्यामुळे स्नायू मोकळे होतात.

प्रॉब्लेम्स नाहीसे होतात

हसत राहिल्याने मनावरचे ओझे कमी होते. आपल्या समस्यांवरुन आपले लक्ष थोडा वेळासाठी का होईना विचलित होण्यास मदत होते.

दृष्टिकोन बदलतो

हसण्यामुळे एखाद्या संकटाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हसत राहिल्याने आपला मूड आपोआप चांगला होतो. त्यामुळे एखादी अवघड वाटणारी, कठीण गोष्ट असलीच तर त्याच्याकडे संकट म्हणून न बघता आपण एखादे चॅलेंज म्हणून बघू शकतो.

सामाजिक जीवन सुधारते

हसऱ्या चेहऱ्याची, हसणारी माणसे सगळ्यांचीच लाडकी असतात. आपण जर हसरे असू तर अनेक माणसे जोडण्यात यशस्वी होतो. लोकांचा गोतावळा जमवला की साहजिकच एकटेपणा जाणवत नाही आणि आपले सामाजिक जीवन देखील सुधारते.

First Published on: November 25, 2020 6:36 AM
Exit mobile version