महिलांनी वाढत्या वयासह कराव्यात ‘या’ टेस्ट

महिलांनी वाढत्या वयासह कराव्यात ‘या’ टेस्ट

चंदा मांडवकर :

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला काही आजार होतात. त्यामुळे योग्य वेळी त्याकडे लक्ष न दिल्यास त्याचे परिणाम गंभीर ही होऊ शकतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना खासकरुन आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असते. कारण वाढत्या वयासह त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच महिलांनी वाढत्या वयासह नक्की कोणत्या चाचण्या केल्या पाहिजेत याच बद्दल पाहूयात.

वैद्यकीय चाचणी गरज का असते? वैद्यकीय चाचणी करण्यामागील मुख्य उद्देश असा की, सुरुवातीला आजार कळल्यास आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार केल्यास तो बरा होऊ शकतो. काही अशा चाचण्या असतात ज्या आजारी पडल्यानंतर नव्हे तर वाढत्या वयासह करणे अत्यंत गरजेचे असते. जसे की, तुम्ही फिट असलात तरीही वयाच्या चाळीशी नंतर प्रत्येक महिला आणि पुरुषाने प्रत्येक २ वर्षात आपले संपूर्ण मेडिकल चेकअप करावे. तसेच वयाच्या ५५ वर्षानंतर प्रत्येक १ वर्षानंतर महिला असो किंवा पुरुष त्यांनी ही आपली मेडिकल टेस्ट करावी.

तसेच सर्वसामान्यपणे आपण आपले वजन करुन पाहतो. कारण अधिक वजन असेल तर काही गंभीर आजार होण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त जर वेगाने वजन कमी होत असेल तरीही ते काही आजारांची लक्षणं असतात. त्याचसोबत रक्तदाब ही तपासून पाहणे गरजेचे असते. फक्त रक्तदाब दररोद तपासून जरी पाहिले तरीही बहुतांश गंभीर आजारांपासून दूर राहता येऊ शकते. दीर्घकाळापर्यंत उच्चरक्तदाब असेल तर हृदयासंबंधितच नव्हे तर काही गंभीर आजार ही होऊ शकतात.

महिलांनी वाढत्या वयासह केल्या पाहिजेत पुढील चाचण्या

या चाचणीमुळे तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याबद्दल कळते. चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर प्रत्येक २ वर्षात तुम्ही जाड, हृदयासंबंधित आजार किंवा मधुमेह झाल्यास तर तुम्ही लिपिड प्रोफाइल टेस्ट केली पाहिजे. ही चाचणी प्रत्येक वर्षात एकदा तरी करावी असा सल्ला दिला जातो.

अॅनिमिया, इंफेक्शन किंवा अन्य काही प्रकारच्या कॅन्सर बद्दल जाणून घेण्यासाठी ही चाचणी केली जाते. ही चाचणी वयाच्या २० व्या वर्षानंतर भारतीय महिलांसाठी गरजेची असते. कारण भारतात बहुतांश महिलांमध्ये लोहाची कमतरता आढळते.

ही ब्लड टेस्ट हाइपोथायराइडिज्म बद्दल कळण्यासाठी असते. त्याचा रिपोर्ट सामान्य आल्यास तरी वर्षातून एकदा तरी महिलांना ही चाचणी करण्यास सांगितली जाते. भारतात पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉइडची समस्या तिप्पट आढळते.

सेक्शुअली अॅक्टिव्ह झाल्यानंतर प्रत्येक महिलेला एचआयवी, हेपेटाइटिस बी आणि सी सारखी सेक्शुअली टेस्ट केली पाहिजे. ही चाचणी करणे गरजेचे असते कारण तुम्ही प्रेग्नेंसीसाठी जर तयारी करत असाल.

पॅप स्मीयर टेस्ट याच्या माध्यमातून प्री-कँन्सरकारक बदलांवाचा शोध घेतला जाऊ शकतो. ही चाचणी २१ व्या वर्षानंतर खासकरुन सेक्शुअली अॅक्टिव्ह प्रत्येक महिलेला करण्याचा सल्ला दिला जातो. कॅल्शिअम आणि विटामिन डी चाचणी कॅल्शिअरच्या टेस्टमध्ये ब्लड टेस्टच्या माध्यमातून बोन मेटाबॉलिज्म पाहिले जाते. ही चाचणी महिलांसाठी महत्वाची असते. कारण त्यांना ऑस्टियोपोरोसिसचा धोका अधिक असतो.

 


हेही वाचा :

भारतीय इतिहासातील सर्वात सुंदर आणि धाडसी राण्या

First Published on: January 13, 2023 4:50 PM
Exit mobile version