‘हे’ पदार्थ देतील उन्हाळ्यात गारवा

‘हे’ पदार्थ देतील उन्हाळ्यात गारवा

हे पदार्थ देतील उन्हाळ्यात गारवा

सध्या मुंबईचे तापलेले वातावरण पाहता मुंबईकरांना थंडाव्याची अत्यंत गरज आहे. मात्र, शरीराला थंडावा मिळण्यासाठी अनेकदा आईसक्रीमचे सेवन केले जाते आणि शरीराला थंडावा मिळतो. परंतु असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे शरिराला थंडावा मिळतो.

गुलकंद

गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केला जाणारा गुलकंद खाण्यासाठी चविष्ट तर असतोच मात्र, आरोग्यासाठीही तो तितकाच फायद्याचा आहे. जेवणानंतर गुलकंद खाल्ल्यास पचन उत्तम होण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्यात उद्भवणारे पचनाचे विकार दूर ठेवण्यास मदत होते.

जिऱ्याचे पाणी

एका ग्लासात चमचाभर जिरे भिजत घालून त्या पाण्याचे अनशापोटी सेवन करावे. त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. हे पाणी प्यायल्यावर जिरे चावून खावेत.

सब्जा

उष्णता कमी करण्यासाठी सब्जाचे पेय खूप फायदेशीर ठरते. सब्जा हा थंड असल्याने शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सब्जाच्या बिया पाणी, लिंबूपाणी, सरबत किंवा मिल्कशेक सारख्या ड्रिंकमध्ये वापरतात. यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

ताक

ताकाला अमृताची उपमा देण्यात आली आहे. ताकात काळे मीठ आणि हिंग घालावे. दिवसातून दोन ते तीन वेळी ताक प्यायल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो.

कोथिंबीर

कोथिंबीर ही थंड असते. त्यामुळे कोथिंबीर वाटून केलेला रस हा उष्णतेचा विकार आणि पित्तावर गुणकारी आहे. अगदी रस नाही तरी जेवणात कोथिंबीरचा वापर अधिक करावा.

First Published on: May 25, 2019 7:30 AM
Exit mobile version