Thursday, May 16, 2024
घरमानिनीRecipeChutney : हेल्दी अ‍ॅण्ड टेस्टी पेरूची चटणी

Chutney : हेल्दी अ‍ॅण्ड टेस्टी पेरूची चटणी

Subscribe

हिवाळा सुरू झाला की पेरू बाजारात मोठ्या प्रमाणात येतात. पेरू खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आज आपण पेरूची चटणी तयार कशी करतात हे पाहणार आहोत.

साहित्य :

  • 2 पिकलेले पेरू
  • कोथिंबीर
  • पुदीना
  • 3-4 हिरवी मिरची
  • आले
  • जिरे
  • चाट मसाला
  • मीठ
  • जीरे पावडर
  • लिंबू

कृती :

घर पर ट्राई करें अमरूद की चटनी, खाने में लगती है बेहद स्वादिष्ट, ये रही  रेसिपी - Guava Chutney Recipe How to make amrood ki chutney lbsf - AajTak

- Advertisement -
  • सर्वप्रथम पिकलेला पेरूचे चार भाग करा आणि त्यातील बिया काढून पेरू छोट्या किसणीवर किसून घ्या.
  • त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर, पुदीना, हिरव्या मिरच्या, थोडेसे आले, जिरे, चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घालून जाडसर वाटून घ्या.
  • मग त्यामध्ये दोन चमचे पाणी आणि एक चमचा किसलेला पेरू घालून ते व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर हे मिश्रण सर्व किसलेल्या पेरूत घाला आणि त्यामध्ये जीरे पावडर घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे.
  • मग त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार पेरुची चटणी टेस्ट करा.

हेही वाचा :

Veg Omelette : Yummy रवा ऑम्लेट

- Advertisment -

Manini