अनेक समस्यांवर सुंठ एक रामबाण उपाय

अनेक समस्यांवर सुंठ एक रामबाण उपाय

बऱ्याचदा खोकला लागला की, त्या व्यक्तीला सुंठ खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हे सुंठ फक्त खोकल्यावर नाहीतर इतर आजारांवर देखील गुणकारी असे औषध आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत सुठांचे सेवन कमी प्रमाणात केले जाते आणि थंडीच्या दिवसात सुंठाचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते. विशेष म्हणजे त्याचा अधिकच फायदा होतो. चला तर जाणून घेऊया सुंठ खाण्याचे गुणकारी फायदे

डोकेदुखी

डोकेदुखीवर सुंठ एक रामबाण उपाय आहे. सुंठेमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामुळे रक्ताभिसरण सुरळित होते. शरीरात ऑक्सिनचे प्रमाण वाढते आणि ऑक्सिनचे प्रमाण वाढल्याने रक्तभिसरण सुरळित होत असल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते.

कोलेस्ट्रोल

ड्राय जिंजरमुळे कोलेस्ट्रोल कमी होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. सुंठेमुळे शरीरात कोलेस्ट्रोलचे प्रमाण आणि ब्लड शुगर योग्य प्रमाणात राहते.

पोटासंबंधीचे आजार

गॅस, अपचन, अतिसार यांसारख्या इतरही पोटाच्या समस्या असल्यास सुंठ त्यावर एक रामबाण उपाय आहे. सुंठेत अॅन्टी इन्फ्लेमेन्टरी तत्व असतात. जे पोटाच्या समस्या ठिक करण्यासाठी मदत करतात.

पचनशक्ती सुधारते

सुंठेच्या नियमित सेवनाने पचनशक्ती मजबूत होण्यास मदत होते. सुंठेत असणारे अॅन्टी- इन्फ्लेमेन्टरी तत्व हृदयासंबंधी आजारांचा धोकाही कमी करतात.

नैसर्गिक पेनकिलर

एका संशोधनानुसार, सुंठ एक नैसर्गिक, नॅच्युरल पेनकिलर असल्याचे सांगण्यात आले आहे. सुंठेमध्ये दुखणे कमी करण्याचे औषधीय तत्व असतात. अनेकदा महिलांना मासिक पाळीदरम्यान सुंठ असलेला चहा घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे त्यांना होणाऱ्या समस्या तात्काळ दूर होण्यास मदत होते.

First Published on: February 7, 2020 6:30 AM
Exit mobile version