Friday, May 17, 2024
घरमानिनीRecipeमुलं पालेभाजी खाण्यास कंटाळतात, मग वापरा 'हे' पर्याय

मुलं पालेभाजी खाण्यास कंटाळतात, मग वापरा ‘हे’ पर्याय

Subscribe

हिरव्या भाज्यांमध्ये असलेले पोषक तत्व हेल्दी ग्रोथसाठी फायदेशीर मानले जातात. परंतु अशी काही मुलं असतात ज्यांना हिरव्या पालेभाज्या खाणे अजिबात आवडत नाही. तुमचे ही मुलं असेच करते का? यामुळे मुलाची योग्य वाढ आणि त्याला पुरेसे पोषक तत्व कसे मिळणार याची चिंता नेहमीच वाटत राहते. (Green leafy vegetables)

बहुतांश लहान मुलांना हिरव्या पालेभाज्या खायला आवडत नाही. अशातच तुम्ही त्यांना ते आवडीने खाव्यात म्हणून त्याचे विविध पदार्थ बनवून देऊ शकता. आता तुम्ही विचार कराल हे कसं शक्य आहे? खरंतर हिरव्या भाज्यांच्या सब्सीट्युटच्या मदतीने तुम्ही मुलांना डाएटमध्ये अशा पर्यायांची निवड करा ज्यामधून सुद्धा त्यांना पोषक तत्व मिळतील.

- Advertisement -

मशरूम


हिरव्या भाज्यांचे एक बेस्ट सब्सीट्युट म्हणजे मशरूम. नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनच्या नुसार, यामध्ये भरपूर प्रमाणात अँन्टीऑक्सिटेंड असतात. त्याचसोबत यामध्ये विटामिन डी, विटामिन B12, लोह, कॉपर, कॅल्शिअम याचा सुद्धा उत्तम स्रोत असतो. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवायची असेल तर तुम्ही त्यांना मशरूम खायला देऊ शकता. मशरूम तुम्ही त्यांना सँन्डविच, नूडल्स मध्ये वापरुन खायला द्या.

- Advertisement -

मुळा


मुळ्यात विटामिन सी, पोटॅशियम, फॉलेट आणि फायबर सारखे महत्वपूर्ण पोषक तत्व असतात. तुम्ही ते सॅलेड आणि अन्य रुपात साइड डिशनुसार वापरु शकता. याच्या सेवानाने मुलांचे आरोग्य हेल्दी राहतेच पण शारिरीक फंक्शन सुद्धा प्रोमोट होते. या व्यतिरिक्त हेल्थ आणि स्नायू सुद्धा मजबूत होतात. यामध्ये असलेले फॉलेट सेल्स डिविजनमध्ये मदत करतात. मुळा तुम्ही सँन्डविच, रोल्स, नुडल्स किंवा सूपमध्ये वापरु शकता.

काकडी


नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन नुसार, काकडीमध्ये पाणी भरपूर प्रमाणात असते. यामुळे तुम्ही दीर्घकाळ हायड्रेट राहता. लहान मुलांना खेळायला खुप आवडत असल्याने त्यांना घाम आल्यानंतर शरिरातील पाणी कमी होते. अशातच तुम्ही मुलांना काकडी खायला देऊ शकता. काकडीमध्ये विटामिन के, लोह, कॅल्शियम, विटामिन बी, पोटॅशियम सारखे महत्वपूर्ण तत्व असतात. त्यामुळे शरिराचे तापमान संतुलित राहते.

गाजर


गाजराची चवं थोडीशी गोडसर असते. त्यात फायबर, विटामिन ए, बीटा कॅरोटिन सारखे पोषक तत्व असतात. यामध्ये असलेले विटामिन एक मुलांच्या डोळ्यांसाठी फार उत्तम असते. त्याचसोबत सेल्सला ग्रो करण्यासाठी, किडनी लंग्स यांचे काम सुरुळीत सुरु ठेवण्यासाठी सुद्धा गाजर मदत करते. मुलांना ब्राइट कलर फार आवडतात. त्यामुळे तुम्ही त्यांना गाजर खायला देऊ शकता.


हेही वाचा- तुम्हालाही मध्यरात्री भूक लागते? मग खा ‘हे’ हेल्दी पदार्थ

- Advertisment -

Manini