तुमच्याही टाचा दुखतात? ‘हे’ करा उपाय

तुमच्याही टाचा दुखतात? ‘हे’ करा उपाय

तुमच्याही टाचा दुखतात? 'हे' करा उपाय

सध्याच्या धावपळीत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. यामध्ये पाय दुखणे, तळवे दुखणे किंवा सूज येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात अलीकडे अनेक तरुण पिढीच्या पायाच्या टाचा दुखण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. टाचा दुखण्याची कारणे म्हणजे एखाद्याचे अधिक वजन असणे. किंवा खूप वेळ उभे राहणे, चुकीची चप्पल किंवा बूट घालणे. यामुळे टाच दुखण्यास सुरुवात होते. मात्र, हे दुखणे अतिशय असह्य होते. या घरगुती उपयांनी टाचांच्या दुखण्यावर आराम मिळण्यास मदत होईल.

बर्फाचा शेक

टाचा दुखत असल्यास बर्फाने १५ मिनिटे शेका. बर्फाच्या थंडाव्यामुळे पेशीत निर्माण झालेला ताण, त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे आराम मिळतो.

तेलाची मालिश

टाचांचे दुखणे कमी करण्यासाठी तेलाचे मालिश हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे दुखण्यावर लगेचच आराम मिळतो. मसाज केल्याने मसल्स रिलॅक्स होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. यासाठी खोबरेल तेल, मोहरीचे तेल इत्यादीने टाचांना मसाज करा. यामुळे दुखणे कमी होते.

मीठ आणि पाणी

एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात दोन चमचे जाडे मीठ घाला. त्यानंतर त्या पाण्यात १५ – २० मिनिटे पाय बुडवून ठेवा. यामुळे आराम मिळण्यास मदत होते.

दूध हळद

एक ग्लास दूधात अर्धा चमचा हळद घालून ५ मिनिटे मंद आचेवर गरम करा. नंतर दुधात एक चमचा मध घाला आणि त्या दुधाचे सेवन करा. टाचांचेच नाही तर शरीरातील इतर भागातील दुखण्यापासून आराम देण्यासही मदत होते.

First Published on: May 20, 2020 6:28 AM
Exit mobile version