रफ केसांना बनवा ‘सिल्की’

रफ केसांना बनवा ‘सिल्की’

(फोटो प्रातिनिधिक आहे)

काही व्यक्तींचे केस प्रचंड राठ आणि रफ असतात. हे केस सिल्की करण्यासाठी अनेक व्यक्ती महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र तरीदेखील केस सिल्की होत नाहीत. उलवट अशा उत्पादनांमुळे केस आणखी खराब होऊन गळण्यास सुरुवात होते. परंतु काही घरगुती उपायांमुळे केस ‘सिल्की’ होण्यास मदत होते.

कोरफड

कोरफडीचा गर हा केसांवर एक रामबाण उपाय आहे. आठवड्यात तीन वेळा केसांना कोरफडीचा गर लावल्याने केस सिल्की, शाईनी आणि मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे ज्या व्यक्तींचे केस रफ आहेत त्यांनी कोरफडीचा वापर करावा.

अंड

अंड हे केसांना सिल्की करण्यास मदत करते. अंड्याचा हेअर पॅक तयार करण्यासाठी एक चमचा तेलात अंड्याचा पांढरा बलक मिक्स करुन हा तयार झालेला हेअर पॅक आठवड्यातून एकदा केसांना लावावा. यामुळे केस सिल्की होतात.

दही

केसांना दह्याचा हेअर पॅक लावल्याने केस शाईनी होण्यास मदत होते. दह्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावावे. यामध्ये लिंबाचा रस असल्याने केसातील कोंडा देखील कमी होण्यास मदत होते आणि केस गळणे देखील थांबते. मात्र ज्या व्यक्तींच्या केसांचा स्काल्प तेलकट असल्यास अशा व्यक्तींने हा हेअर पॅक लावू नये.

इ व्हिटामिन गोळी

केसांना तेल लावत असताना त्यामध्ये ‘व्हिटामिन ई’ची गोळी तेलात मिक्स करुन ते तेल केसांना लावावे. यामुळे केस सिल्की होण्यास मदत होते.

केळ

केळाचा हेअर पॅक केसांना लावल्याने केस सिल्की होण्यास मदत होते. हा हेअर पॅक तयार करण्यासाठी केळ कुसकरुन त्यामध्ये थोडेसे मध मिसळून एकजीव करुन घ्यावे. हा हेअर पॅक केसांना आठवड्यातून दोन वेळा लावावा. यामुळे केस सॉफ्ट होण्यास मदत होते.

First Published on: August 2, 2018 7:35 AM
Exit mobile version