फंगल इन्फेक्शन दूर करण्यास करा ‘हे’ घरगुती उपाय

फंगल इन्फेक्शन दूर करण्यास करा ‘हे’ घरगुती उपाय

उन्हाळा असो किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये त्वचेचे अनेक आजार होताना दिसतात. धावपळीच्या वेळापत्रकात आरोग्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही. त्यामुळे अनेक आजार झपाट्याने वाढताना दिसतात, त्यापैकीच एक म्हणजे म्हणजे फंगल इन्फेक्शन. उन्हाळ्यात घामाने किंवा पावसाळ्यात सतत अंग पावसाच्या पाण्याने भिजल्याने अनेकांना फंगल इन्फेक्शन होते. हा आजार संसर्गजन्य आहे. पावसातून कामावर जाताना भिजलेले पाय, ओले कपडे, भिजलेले केस लवकर सुकत नाही, यामुळे फंगल इन्फेक्श जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी महागडे औषधं घेऊन देखील साधे आजार लवकरात लवकर बरे होत नाही, त्यावेळी घरगुती इलाजच लहानसा आजार लवकर बरे करतात.

फंगल इन्फेक्शनपासून दूर राहण्यास करा हे घरगुती उपाय़

कडुनिंब

कडुनिंब हे बुरशी मारण्यासाठी उत्तम औषध आहे. कडुनिंबाचा पाला आंघोळीच्या गरम पाण्यात टाकून स्वच्छ आंघोळ करावी. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट फंगल इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी. रोज दोन कोवळी पानं खावी. त्यामुळे फरक पडतो.

तुरटी

फंगल इन्फेक्शनमध्ये सर्वात गुणकारी औषध म्हणजे तुरटी. आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी किंवा तुरटीचे पाणी इन्फेक्शन झालेल्या जागी लावावे ते पुसून टाकू नये.

लसूण

ऑलिव्ह ऑइलमध्ये लसणाच्या पाकळ्यांचा रस काढून ते तेल लावावं. कारण लसूण अ‍ॅन्टीफंगल म्हणून काम करतं

कोरफड

कोरफडीचा गर काढून तो फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावावा. त्यामुळे खाज सुटणार नाही तसेच त्वचेची आग होणार नाही.

खोबरेल तेल

फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी शुद्ध खोबरेल तेल लावून मालिश करावी. मात्र सगळ्या प्रकारच्या फंगल इन्फेक्शनला हे चालेल असे नाही. अशात डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

स्वछता ठेवा

किमान दिवसातून दोन वेळा स्वच्छ कोमट पाण्यानं आंघोळ करा. कपडे स्वच्छ उन्हात सुकवा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कपड्याला इस्त्री करा. त्यामुळे कपड्यावरील फंगलचे विषाणू मरण्यास मदत होईल.

First Published on: June 30, 2019 6:00 AM
Exit mobile version