Vitamin C Serum : घरच्या घरी अशा पद्धतीने बनवा व्हिटॅमिन सी सिरम

Vitamin C Serum : घरच्या घरी अशा पद्धतीने बनवा व्हिटॅमिन सी सिरम

हल्ली बऱ्याच मुली-महिला व्हिटॅमिन सी सिरम सर्रासपणे वापरतात. व्हिटॅमिन सी शरीरासाठी आणि त्वचेसाठी महत्वाचे असते. व्हिटॅमिन सी सिरम अनेक प्रकारे आपण वापरू शकतो. व्हिटॅमिन सी हे स्किनकेअर इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले अँटीऑक्सीडेंट आहे आणि ते तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये सहजपणे तुम्ही आणू शकता. पण, कधीकधी चुकीच्या पद्धतीने किंवा दुय्यम दर्जाचे सिरम वापरल्याने त्याचा तुमच्या त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

व्हिटॅमिन सी – फळे आणि भाज्यांमधून नैसर्गिकरित्या काढलेले, व्हिटॅमिन सी एक शक्तिशाली अँटीऑक्सीडेंट म्हणून कार्य करते. ज्यामुळे तुमची त्वचा उजळते आणि त्वचेवरील काळे डाग निघून जातात. परिणामी, संपूर्ण त्वचेचा टोन समतोल राहतो. व्हिटॅमिन सी सिरम त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. पण पैशांचा विचार केल्यास ते खूप महाग असते. अशावेळी तुम्ही घरच्या घरी व्हिटॅमिन सी सिरम घरच्या घरी बनवून ते तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये ऍड करू शकता.

व्हिटॅमिन सी त्वचेवर कार्य कसे करते – त्वचेसाठी अमृत म्हणजे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी मुळे त्वचा घट्ट होते, त्वचेच्या सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा ब्राईट होते. तुम्ही नियमितपणे व्हिटॅमिन सी वापरल्यास, तुम्ही त्वचा पूर्वीपेक्षा घट्ट आणि ब्राईट होईल. तसेच त्वचेची हरवलेली चमक परत आणण्यास मदत होईल. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी चा वापर करायला हवा. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही याचा वापर करायला हवा.

सिरम बनविण्यासाठी साहित्य –
2 व्हिटॅमिन सी गोळ्या
2 चमचे गुलाबपाणी
1 टीस्पून ग्लिसरीन
1 व्हिटॅमिन इ कॅप्सूल
सिरम साठविण्यासाठी रिकामी काचेची बाटली

व्हिटॅमिन सी च्या गोळ्याची पावडर करून घ्या आणि ती पावडर रिकाम्या बाटलीत टाका. आता त्यात गुलाबपाणी टाकून दोन्ही गोष्टी नीट एकत्र मिक्स करा. तयार मिश्रणात व्हिटॅमिन इ कॅप्सूल टाका. आता हे सर्व मिश्रण नीट मिसळ्यासाठी बाटली थोडा वेळ हलवा यानंतर बाटली थंड आणि अंधार असेल अशा जागी ठेवा. तुम्ही हे सिरम 2 आठवडे वापरू शकता.

घरच्या घरी तयार केलेले सिरम तुमच्या त्वचेसाठी बाजारातील सिरम इतकेच आहे. जर तुम्ही हे सिरम नियमितपणे वापरत असाल तर तुम्हाला काही दिवसातच तुमच्या त्वचेत फरक जाणवेल. जर तुमची त्वचा खूप जास्त निस्तेज झाली असेल आणि तुम्हाला अँटी एजिंगचा प्रॉब्लेम असले तर ते हे सिरम नक्की एकदा वापरून पहा.

 

 

 

 


हेही पहा :

First Published on: April 9, 2024 11:18 AM
Exit mobile version