Makar Sankranti 2021: असे पुजले जाते ‘सुगड’

Makar Sankranti 2021: असे पुजले जाते ‘सुगड’

Makar Sankranti 2021: असे पुजले जाते 'सुगड'

‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’, असं सांगणार सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी मकर संक्रांती देशभर साजरी केली जाते. यादिवशी तिळगूळ वाटणे, पतंग उडवणे यासोबतच सुहासिनी महिला सुगडाची पूजा देखील करतात. मात्र, ही पूजा कशी केली जाते. याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

सुगड म्हणजे काय?

संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते. हे सर्वांनाच माहित आहे. हे सुगड काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीचे असते. सुगड हा शब्द खर तर अपभ्रंश होऊन आला आहे. ‘सुघट’ या शब्दाचा हा अपभ्रंश आहे. ‘सुघट’ म्हणजे सुघटीत असा घड. यामध्ये शेतात बहरलेले नवं धान्य ठेवून त्याची सुहासिनी महिला पूजा करतात.

असा पूजला जातो सुगड

सर्वप्रथम चौरंगवर रांगोळी काढली जाते. त्यानंतर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे. नंतर सुगडाला हळद-कुंकूवाची बोटे ओडून त्याची मांडणी केली जाते. सुगडामध्ये हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद-कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालावे. नंतर सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून नमस्कार करावा. नंतर गोड अशा तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा.

अशी आहे संक्रांतीची पुराणातील कथा

श्रीमद्भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजाचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते. कारण सूर्य देवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पहिले होते. या गोष्टीने नाराज होऊन सूर्य देवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते. म्हणून शनी व छाया यांनी सूर्य देवाला कुष्ठरोग्याचा शाप दिला होता.


हेही वाचा – Makar Sankranti 2021 : तिळगूळ खा निरोगी रहा!


First Published on: January 12, 2021 6:38 PM
Exit mobile version