दिवसभरात किती पोळ्या खाल्ल्या पाहिजेत?

दिवसभरात किती पोळ्या खाल्ल्या पाहिजेत?

भारतीय थाली ही पोळ्यांशिवाय अपूर्ण असल्यासारखी वाटते. पोळी आपल्या जेवणातील महत्वाचा भाग मानला जातो. त्याचसोबत पोळ्या नसतील तर आपली भूक शांत ही होत नाही.देशातील विविध ठिकाणी दिवस-रात्र केवळच पोळ्या खाल्ल्या जातात. यामागील कारण असे की, बहुतांश लोकांचे असे मानणे असते पोळ्या या भाताच्या तुलनेत अधिक फायदेशीर असतात. पोळ्या खाल्ल्याने माणूस जाड होत नाही.

अशातच तुम्हाला माहितेय का प्रत्येक गोष्टी प्रमाणेच पोळ्या कधी खायच्या याची सुद्धा एक वेळ असते. कारण पोळ्यांमध्ये अधिक कॅलरी आणि कार्ब्स असतात. जे आरोग्याला नुकसान पोहचवू शकतात. गव्हाच्या एका पोळीत जवळजवळ १०४ कॅलरी असतात. तज्ञांचे असे म्हणणे आहे की, एका पोळीत १५ ते २० ग्रॅम कार्बोहाइड्रेट आणि ६०-७० ग्रॅम कार्ब्स असतात.

एका दिवसात किती पोळ्या खाव्यात?
पुरुष आणि महिलांनी दिवसभरातून किती पोळ्या खाल्ल्या पाहिजेत याचे प्रमाण वेगवेगळे असते. अशातच ज्या महिलांच्या डाएट प्लॅनमध्ये १४०० कॅलरीचे सेवन केले जाते तेव्हा त्या २ पोळ्या सकाळी आणि २ पोळ्या रात्री खाऊ शकतात.

तसेच पुरुष मंडळींचा डाएट प्लॅन १७०० कॅलरीचा असेल तर त्यांनी लंच आणि डिनरमध्ये तीन-तीन पोळ्या खाऊ शकतात. जर तुम्ही रात्रीच्या वेळी पोळी खाता तर ती पचण्यास फार वेळ लागतो. याच कारणास्तव शरिरातील शुगर लेवर वाढते. तसेच रात्रीच्या जेवणात पोळीचा समावेश करु नये.

रात्री किती पोळ्या खाल्ल्या पाहिजेत?
जर तुम्ही रात्रीच्या वेळी पोळ्या खात असाल तर २ पेक्षा अधिक खाऊ नका. पोळ्या खाल्ल्यानंतर थोडावेळ चाला. कारण पोळ्यांच्या पचनासाठी वेळ मिळेल.

वजन कमी करण्यासाठी किती पोळ्या खाव्यात?
शरिरातील अधिक बॉडी फॅट कमी करण्यासाठी कार्बोहाइड्रेट पासून दूर रहावे. अशातच जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर दिवसभरात २ चपात्या खा.

 


हेही वाचा- न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरचा 3:2:1 फॉर्म्युला वापरा, वजन कमी करा

First Published on: April 21, 2023 4:20 PM
Exit mobile version