पांढऱ्या शुभ्र दातांसाठी घरगुती उपाय

पांढऱ्या शुभ्र दातांसाठी घरगुती उपाय

(फोटो प्रातिनिधिक आहे)

आपण सतत काहींना काही खात असतो. मात्र काहीही खाल्ले की आपण तोंड धुतोच असे नाही. त्यामुळे दातांवरचा पांढरेपणा दूर होऊन त्यावर पिवळा थर जमा होतो. त्यामुळे दात पिवळसर होतात. परंतु घरगुती उपाय केल्यास हा पिवळसरपणा दूर होण्यास मदत होते.

बेकिंग सोडा

दात पांढरेशुभ्र करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. हा सर्वात सोपा आणि घरगुती उपाय आहे. यामुळे दात पांढरेशुभ्र होण्यास मदत होते.

तुळशीची पाने

पिवळ्या दातांसाठी तुळशीची पाने एक उत्तम उपाय आहे. तुळशीची पाने उन्हात सुकवून त्याची पावडर तयार करावी. ही पावडर दातांना चोळल्याने दातांना एक वेगळीच चमक येते.

मीठ आणि राईचे तेल

बारीक मीठामध्ये थोडेसे राईचे तेल मिक्स करावे. या तयार झालेल्या पेस्टने दात घासावे. यामुळे दात पांढरेशुभ्र होण्यास मदत होते.

लिंबू

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी लिंबू अतिशय उपयुक्त असते. पाणी आणि लिंबाचा रस एकत्र करुन त्या पाण्यानी जेवणानंतर गुळण्या कराव्या यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होऊन दात पांढरे शुभ्र होण्यास मदत होते.

गाजर

दात स्वच्छ करण्यासाठी आणि दातावरील पिवळेपणा कमी करण्यासाठी गाजर एक रामबाण उपाय आहे. गाजर उभे कापून त्यांनी दात घासल्यास दात पांढरे शुभ्र होण्यास मदत होते.

First Published on: October 1, 2018 10:25 PM
Exit mobile version