झणझणीत ‘मालवणी चिकन’

झणझणीत ‘मालवणी चिकन’

झणझणीत 'मालवणी चिकन'

दर आठवड्याच्या रविवारी काय करावे असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. त्यात बाहेर पासून, रविवार आणि सोबत चिकन हे समीकरणच वेगळ असतं. तसेच चिकनमुळे जेवणात देखील एक वेगळीच लजत येते. अशावेळी झणझणीत मालवणी चिकनआणि कोंबडी वडे असल्यास तो रविवार देखील सुखकर जातो.

साहित्य

कृती 

सर्वप्रथम आलेलसूणकोथिंबीर मिक्सर वर बारीक वाटून घ्या. त्यानंतर चिकनला तयार पेस्ट, हळद, मसाला आणि मीठ लावून तास मॅरीनेट करून ठेवा. त्यानंतर कढईत चमचा तेलात कांदा, धणे, लवंग, तेजपान , दालचिनी आणि वेलची परतून घेणे. ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरवर थोडे पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्या. त्यानंतर पातेल्यात तेल गरम करून बारीक दुसरा चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर परता. लाल तिखट मालवणी मसाला घाला आणि मॅरीनेट केलेले चिकन घालून परता. त्यात कप पाणी घाला. त्यानंतर ४५ मिनिटे चिकन चांगले शिजू द्या. चिकन शिजले कि नंतर वाटण घालून सगळं नीट मिक्स करा. चिकन शिजवून झाले की कोथिंबीर टाकून कोंबडी वड्यान सोबत खायला घ्या.

First Published on: July 21, 2019 5:00 AM
Exit mobile version