तेलाचा वापर न करता ही केस बनवा मजबूत

तेलाचा वापर न करता ही केस बनवा मजबूत

केस बनवा मजबूत

केस मजबुत आणि दाट बनवण्यासाठी बऱ्याचदा केसांना तेल लावण्याचा उपाय सांगितला जातो. मात्र, काही व्यक्तींना तेल लावण्यास आवडत नाही. परंतु तेल न लावता देखील काही घरगुती उपाय केल्याने देखील केस मजबूत आणि दाट ठेऊ होऊ शकतात. जाणून घ्या, असे काही घरगुती उपाय.

दही

केसांसाठी दही एक रामबाण उपाय आहे. २ चमचा कांद्याच्या रसामध्ये एक चमचा आंबट दही आणि थोडासा लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावून ३० मिनिटानंतर धुवून घ्या. यामुळे केस मऊ होण्यास मदत होते.

अंड्याचा पांधरा भाग

२ चमचा कांद्याच्या रसामध्ये एका अंड्याचा पांढरा भाग मिक्स करा. या मिश्रणांनी संपूर्ण स्कल्पला मसाज करा आणि एका तासानंतर केस धुवून घ्या. यामुळे केस सॉफ्ट होण्यास मदत होते.

कढीपत्ता

कढीपत्ता देखील केसांवर एक चांगला उपाय आहे. एक चमचा कढीपत्त्याच्या पेस्टमध्ये थोडेस दही घालून मिक्स करा. हे मिश्रण नियमित केसांना लावल्याने केस दाट होण्यास मदत होते.

ऐलोवेरा जेल

नियमित केसांना एक चमचा ऐलोवेरा जेल लावून एका तासांनी केस धुवून घ्या. यामुळे कोंडा आणि हेअर फॉलची समस्या दूर होऊन केस मऊ होण्यास मदत होते.

लिंबू

दररोज दोन लिंबूच्या रसाने केसांना मसाज करा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

मेथी दाने

दोन चमचे मेथी रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी हे बारीक करुन केसांना लावा. यामुळे केस मजबुत होण्यास मदत होते.

गाजर

दररोज केसांना गाजराचा रस लावल्यामुळे केस मऊ होण्यास मदत होते.

लसूण

दोन चमचे लसणाचा रस कोसांच्या मुळावर लावा आणि १ तसांने केस धुवून घ्या. यामुळे केस दाट होण्यास मदत होते.

बीट

एक चमचा बीट रस आणि तिळाचे तेल मिक्स करुन घ्या. हे डोक्यावर लावा आणि एका तासानंतर धुवून घ्या. यामुळे केस मजबुत होतात.

बटाटे

दोन ते तीन बटाटे बारीक करुन त्याचा रस काढून घ्या. हा रस केसांना लावा. यामुळे केस मजबुत होण्यास मदत होते.


वाचा – निरोगी केसांसाठी रामबाण कढीपत्ता

वाचा – रेशमी, लांब केसांसाठी


 

First Published on: March 13, 2019 3:19 PM
Exit mobile version