हिवाळात अशी घ्या केसांची काळजी

हिवाळात अशी घ्या केसांची काळजी

हिवाळात अशी घ्या केसांची काळजी

हिवाळ्यात त्वचा जशी कोरडी होते तसे केस देखील कोरडे होतात. अशावेळी केस रुक्ष होऊ नयेत यासाठी काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबत केसांचीही विशेष काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल खास माहिती देणार आहोत.

रुक्ष केसांकरता

केस हिवाळ्यात अधिक प्रमाणात रुक्ष होतात अशावेळी केसांना ऑइल मसाज केल्याने केस मऊ होतात. केस धुण्यापूर्वी त्यांना तेल लावल्याने केसांमधून प्रोटिन्स जाण्याचे प्रमाण २८ टक्क्यांनी कमी होतं. केस धुतल्यानंतरही पोस्ट वॉश कण्डिशनर म्हणून खोबरेल तेल केसांना लावता येईल.

कोंडा दूर होतो

हिवाळ्याच्या दिवसांत डोक्याची त्वचा कोरडी होत होते. त्यामुळे डोक्यात कोंडा होतो. मात्र, यापासून सुटका करायची असेल तर गरम तेलामध्ये लिंबाचा एक चमचा रस मिसळून लावा. हे मिश्रण रात्री केसांना लावा आणि सकाळी कोमट पाण्याने केस धुऊन टाका. यामुळे केसांतील कोंडा दूर होतो.

केस चमकण्यासाठी

थंडीमुळे केस रुक्ष होऊन त्याची चमकही फिकी पडते. ती दूर करण्यासाठी केसांच्या मुळांना मध लावा. त्यानंतर केसांना एक तास टॉवेलने बांधून ठेवा. त्यानंतर केस धुऊन काढा. यामुळे केस पुन्हा चमकण्यास मदत होते.

मॉइश्चरचे प्रमाण कमी झाल्यास

स्काल्पमधील मॉइश्चरचे प्रमाण कमी झाल्याने केसात कोंडा होतो. यासाठी कडुलिंब, लिंबू आणि टी ट्री ऑइलसारखे ऑइल केसांना लावता येईल.

रक्ताभिसरण वाढवण्यासाठी

केसांचा कोरडेपणा कमी करुन त्याचे आरोग्य सुधारण्यासाठी डोक्याचे रक्ताभिसरण वाढवण्याची गरज असते. याकरता ड्रायफ्रूट्स खाणे फायदेशीर आहे. ड्रायफ्रूट्समध्ये असलेल्या पोषक गुणधर्मामुळे केस दाट, मऊ आणि मजबूत होण्यास मदत होते.

First Published on: November 22, 2019 6:00 AM
Exit mobile version