Summer Care of Kids -उन्हाळ्यात मुलांची घ्यावी अशी काळजी

Summer Care of Kids -उन्हाळ्यात मुलांची घ्यावी अशी काळजी

सध्याच्या कडक उन्हाळ्यामुळे अनेकजण सर्दी खोकला तापाने आजारी आहेत. मात्र मोठ्यांच्या तुलनेत कमी रोगप्रतिकारकशक्ती असलेली लहान मुलं लवकर आजारी पडतात. अशा परिस्थितीत मुलांची अतिरिक्त काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

त्यासाठी उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी मुलांना हलक्या रंगाचे कपडे (फॅब्रिक्स) घालावेत.

त्यातही बऱ्याचवेळा मुलांना गरम होत असल्याने, घाम येत असल्याने आपण, मुलांना उघडे ठेवतो.

पण तसे करू नये त्यामुळे मुलांच्या त्वचेवरच थेट गरम वाफ येते

यामुळे मुलांना शरीर पूर्णपणे झाकले जाईल असे कपड घालावे.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.

त्यामुळे उन्हाळ्यात मुलांना जास्तीत जास्त पाणी पिण्यास सांगावे.

मुलांना संध्याकाळी समुद्रकिनारी किंवा पार्कमध्ये न्यावे. जिथे फारशी गर्दी नसते.

आहार

उन्हाळ्यात मुलांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. कारण लहान मुले उष्माघात आणि पक्षाघाताचा सहज बळी ठरतात.

तसेच या दिवसात पोटाच्या समस्याही सामान्य असतात. यामुळे उन्हाळ्यात मुलांना साधा पण सकस आहार द्यावा.

कांदा
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी कांदा खाणे खूप फायदेशीर आहे. यामुळे लहान मुलांना डाळ किंवा भाजीमध्ये कांदा घालून द्यावा. कांद्याचे पराठेही बनवू शकता. सॉस किंवा चटणीसह मुलं आवडीने खातात.

नारळ पाणी
नारळपाण्याला अमृत असे म्हणतात. यामुळे उन्हाळ्यात मुलांना रोज नारळपाणी द्यावे. नारळ पाण्यात पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स असते. जे मुलांना हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तसेच पोट थंड ठेवण्याचे काम करते.

हंगामी फळे
उन्हाळ्यात मुलांना या सिझनमध्ये मिळणारे आंबा, टरबूज, खरबूज अशी विशेष फळे द्यावीत. टरबूजमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते, ते शरीरातील पाण्याची गरज भागवण्यास मदत करते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट मुलांना दीर्घकाळ थंडी प्रदान करते. तुम्ही आंब्याचा रस आणि कच्च्या आंब्याची पेस्ट तयार करून मुलांना देऊ शकता.

हिरव्या भाज्या
मुलं अनेकदा हिरव्या भाज्या खायला कंटाळा करतात. पण हिरव्या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्यात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए सारखे घटक आढळतात. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.

काकडी
उन्हाळ्यात मुलांना काकडी जरूर द्या. यावेळी ते एक वंडरफूड म्हणून काम करते. काकडीत जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. काकडीमध्ये भरपूर फायबर असते, उन्हाळ्यात काकडी खाल्ल्यास पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासून मुलांचे संरक्षण होते. त्यात व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक घटक आढळतात, जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.


Edited By- Aarya Joshi

 

First Published on: May 6, 2024 3:54 PM
Exit mobile version