झटपट बेसन रवा इडली

सौजन्य, गुगल

इडली हा जरी दाक्षिणात्य पदार्थ असला तरी तो आज सगळ्यांच्याच आहारातला महत्वाचा घटक झाला आहे. इडली पचायला हलकी व चवीबरोबरच तब्येतीसाठीही आरोग्यवर्धक आहे. यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच डॉक्टर इडली खाण्याचाही सल्ला देतात. पण आज आम्ही नेहमीच्या इडलीपेक्षा वेगळी अशी अधिक पौष्टीक बेसनच्या इडलीची रेसिपी देत आहोत. कमी वेळात ही बेसन इडली बनवण्यात येते.

साहीत्य- अर्धा कप बारीक रवा, १ कप बेसन, अर्धा कप दही, अर्धा टीस्पून मीठ, पाव चमचा हळद पाऊडर, १ चमचा मोहरी, ८-१० कढीपत्त्याची पाने, पाव चमचा जीरा पूड, १ चमचा नारळाचा चव, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , मीठ चवीनुसार, तेल गरजेनुसार.

कृती– सर्वात आधी एका पातेल्यात रवा, बेसन, हळद , मीठ आणि दही टाकून मिश्रण एकत्र करुन घ्या. थोडे पाणी टाकून इडलीचे पीठ तयार करा. हे पीठ २० मिनिटे ठेवा. नंतर इडली पात्रात इडली बनवा. इडली झाल्यानंतर एका पातेल्यात त्या काढाव्यात. गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात कढीपत्ता, जीरे, मोहरी तडतडली की टाकावी. नंतर नारळाचा चव आणि हिरवी मिरची वरतून टाकावी.instant

First Published on: October 4, 2021 5:37 PM
Exit mobile version