हिवाळ्यात चेहऱ्यासाठी ‘हे’ वापरत असाल तर ठरू शकते घातक

हिवाळ्यात चेहऱ्यासाठी ‘हे’ वापरत असाल तर ठरू शकते घातक

हिवाळ्यात चेहऱ्यासाठी हे वापरत असाल तर ठरू शकते घातक

हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे. हिवाळ्यात आपल्या त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण त्वचेवर अनेक प्रकारचे क्रिम्स लावत असतो. हिवाळ्यात आपली त्वचा नाजूक होते. त्यामुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारचे प्रयोग करण्याआधी हजार वेळा विचार करायला हवा. काही प्रोडक्ट वापरून त्वचेवर काही बदल जाणवले तर लगचेच ते वापरणे थांबवावे. जाणून घेऊया हिवाळ्यात कोणत्या गोष्टी केल्यामुळे आपल्या त्वचेवर त्यांचे वाईट परिणाम होऊ शकतात.

साबण


हिवाळ्यात चुकूनही चेहऱ्याला साबण लावू नका. साबणाने तोंड धुतल्याने त्वचेचा पीएच बॅलन्स बिघडतो. त्यामुळे त्वचा आणखी कोरडी होत जाते. हिवाळ्यात किंवा इतर वेळीही चेहरा धुताना साबणाऐवजी चांगल्या प्रतिचा फेशवॉश वापरा.

टोनर्स


आपण बऱ्याचदा पिंपल्स घालवण्यासाठी किंवा त्वचेवरील छिद्र कमी करण्यासाठी चेहऱ्याला टोनर लावतो. लक्षात ठेवा कधीही जास्त अलक्होल असलेले टोनस चेहऱ्याला लावू नका. टोनर जर अल्कोहोलयुक्त असेल तर हे चेहऱ्याला लावू नका त्याने त्वचा कोरडी पडायला सुरूवात होते.

सुगंधीत प्रोडक्टस


त्वचेसाठी वापरण्यात येणारे बरेच प्रोडक्टसना सुगंध असतो. चेहऱ्याला लावणाऱ्या कोणत्याही प्रोडक्टला जर हिशोबाच्या बाहेर सुगंध येत असेल तर ते प्रोडक्टस कदापि वापरू नका. सुंगधी प्रोडक्टमुळे चेहऱ्याची जळजळ होऊ शकते.

मुलतानी माती


आपल्याकडे बरेच जण मुलतानी मातीही फेस पॅक म्हणून लावतात. उन्हाळ्यात हा फेसपॅक त्वचेसाठी उपयुक्त असतो. परंतु मुलतानी माती ही हिवाळ्यात चेहऱ्याला लावू नका त्याने चेहऱ्यावरील तेल कमी होते आणि तुमची त्वचा कोरडी पडते.

स्क्रब


चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यासाठी आपण वेगवेगळे स्क्रब चेहऱ्याला लावून मसाज करतो. पण थंडीच्या दिवसात चेहऱ्याला स्क्रब करू नका त्यामुळे त्वचेचे मोठे नुकसान होते. स्क्रब ऐवजी तुम्ही घरगुती फेसपॅक चेहऱ्याला लावू शकता.

First Published on: December 6, 2020 8:33 PM
Exit mobile version