Breakup Leave : ऐकावं ते नवलच! ब्रेकअप झाल्यावर कंपनी देते सुट्टी

Breakup Leave : ऐकावं ते नवलच! ब्रेकअप झाल्यावर कंपनी देते सुट्टी

नोकरदार वर्ग विविध कारणांसाठी सुट्टी घेत असतो तर आजारपणासाठी कंपनीला सुट्टीसाठी अर्ज द्यावा लागतो. या सुट्यांचे देखील अनेक प्रकार आहेत. पेड लिव्ह, कॅज्युअल लिव्ह, ट्रॅव्हल लव्ह, मॅटर्निटी लिव्ह या आणि अशा अनेक सुट्ट्या. पण तुम्हाला हे ठाऊक आहे का की, अशी एक कंपनी अस्थित्वात आहे जी चक्क ब्रेकअप झाल्यावर सुट्टी देते. सहसा ब्रेकअप झाल्यावर मित्रमंडळी धावून येतात. पण आता ही कंपनीचं तुमच्या मदतीला धावून येणार आहे.

जर एखाद्याचे ब्रेकअप झाले असेल तर त्यातून त्याला बाहेर येण्यासाठी एकांताची आणि मानसिक शांततेची गरज असते. कर्मचाऱ्यांची ही गरज ओळखून फिनटेक कंपनीने कर्मचाऱ्यांना थेट ब्रेकअप लिव्ह देण्यास सुरुवात केली आहे. ही पगारी सुट्टी असून कंपनीच्या या सुट्टीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. स्टॉक ग्रो असे या कंपनीचे नाव असून ती फायनान्शिअल टेक्नॉलिजीत काम करते. स्टॉक ग्रो कंपनी ग्राहकांना ट्रेंडिग, गुंतवणुकीसंदर्भांत सल्ला देते. या कंपनीचा असा दावा आहे की, या कंपनीचे ३ कोटी युझर्स आहेत. ब्रेकअपच्या मानसिक त्रासातून बाहेर येण्यासाठी व कर्मचाऱ्याला आधार मिळण्यासाठी कंपनीने हा प्रयोग सुरु केला आहे.

जर एखाद्या कर्मचाऱ्याचे ब्रेकअप झाल्यानंतर त्याला मानसिक शांततेची गरज असते. ती शांतता त्याला या सुट्टीच्या माध्यमातून मिळेल असे या कंपनीने सुट्टीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ब्रेकअप लिव्ह पॉलिसीनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्यांचं ब्रेकअप झालं तर कर्मचारी एका आठवड्याची सुट्टी घेऊ शकतो. इतकंच काय तर ब्रेकअप लिव्ह पॉलिसीनुसार, कर्मचाऱ्याने सुट्टी घेतल्यास त्याला बॉस देखील प्रश्न विचारू शकणार नाही. कर्मचाऱ्याला सात दिवसांपर्यंत ब्रेकअप लिव्ह घेता येणार आहे. आपल्या बॉसशी बोलून ही लिव्ह वाढवून सुद्धा घेता येणार आहे. अशा प्रकारच्या सुट्ट्यांमुळे कर्मचाऱ्याला त्याच्या कठीण पिरियड मध्ये शांती मिळेल आणि तो पुन्हा नव्या उमेदीने कामावर रुजू होऊ शकेल. एकंदरच, कर्मचाऱ्याच्या खासगी आयुष्याची काळजी घेणारी ही कंपनी आहे.

 

 

 

 

 


हेही पहा :Lonliness : एकटेपणा कसा दूर कराल?

 

First Published on: April 8, 2024 3:32 PM
Exit mobile version