उन्हाळ्यात घर ठेवा थंड

उन्हाळ्यात घर ठेवा थंड

Home

फिकट रंगाच्या पडद्यांचा वापर करा – उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर सूर्यप्रकाशामुळे घरात जास्त उष्णता निर्माण होते. त्यामुळे घराच्या खिडक्या, दरवाजावर पडद्यांचा वापर करा. पडदे उष्णतेला शोषून घेतात आणि घर थंड ठेवतात. या दिवसात फिकट रंगाच्या पडद्यांचा वापर करावा. कारण पेस्टल, हलके आणि पांढर्‍या रंगाचे पडदे उष्णतेपासून बचाव करतात. म्हणजेच पडद्याचा रंग जेवढा फिका तेवढे तुमचे घर थंड राहील.

कार्पेट किंवा गालीचाचा वापर टाळा – या दिवसात घरात कार्पेट किंवा गालीचाचा वापर करणे टाळावे. कार्पेट, गालिच्यामुळे घर गरम होते. यासाठी घरात थंडावा टिकविण्यासाठी कार्पेट वापरू नका.

दिवसा खिडक्या बंद ठेवा, तर रात्रीच्या उघड्या ठेवा – खिडकीमुळेही नैसर्गिकपणे तुमचे घर थंड राहू शकते. यासाठी आवश्यक आहे की दिवसा घराच्या खिडक्या बंद ठेवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा यामुळे घरात दिवसाची गरम हवा येणार नाही आणि रात्री थंड हवा येऊ शकेल ज्यामुळे घर थंड राहील.

घराचे छत थंड ठेवा – उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर सूर्यकिरणांमुळे घराचे छत तापून घरातील उष्णता वाढते. त्यामुळे या दिवसात घराचे छत थंड ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. या दिवसात तुम्ही घराची सजावट करताना छत शक्यतो सफेद रंगाने रंगवावे. तसेच या दिवसात पीओपी केले तर यामुळे ७० ते ८० टक्के उष्णता कमी शोषली जाते. सफेद रंग रिफ्लेक्टर म्हणून चांगले काम करतो. तसेच घरात थंडावा राहण्यासाठी आणखीन एक उपाय करता येईल. सकाळ संध्याकाळ घराच्या छतावर पाण्याचा वापर करून थंडावा निर्माण करा. यामुळे घराच्या भिंतीचे तापमान थंड राहते. याचसोबत टब किंवा भांड्यात पाणी भरून रूममध्ये ठेवा ज्यामुळे पंख्याची हवा पाण्याच्या संपर्कात येईल आणि घर थंड राहील.

विजेची उपकरणे, दिवे यांचा कमीत कमी वापर करा – विजेवर चालणार्‍या उपकरणांमुळे घराचे वातावरण तप्त होते. कारण विजेवर चालणार्‍या उपकरणामुळे जास्त उष्णता निर्माण होते. यासाठी आवश्यकता नसल्यास टिव्ही, डेस्कटॉप, वॉशिंग मशीन आणि ओवन सारखे उपकरण कमी वापरले पाहिजे. तसेच घरात लावलेले विजेवरचे दिवे उष्णता निर्माण करतात यासाठी जास्त उजेड देणारे बल्ब लावणे टाळावे. जेथे बसण्याची जागा असेल बरोबर त्यावर बल्ब लावणे टाळावे. सिलिंग लाईट जास्त उष्णता निर्माण करतात.

अंगणात झाडे लावा – बेसुमार जंगल तोडीमुळे आपल्याला वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे. हे सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे लावणे, त्यांची वाढ करणे आपले गरजेचे आहे. घराच्या परिसरातील झाडांमुळे घरातील तापमान थंड राहते. त्यामुळे घरातील अंगणात काही छोटी छोटी झाडे तुम्ही लावू शकता. झाडांकडून सोडलेल्या ऑक्सिजनमुळे घर थंड राहते.

First Published on: March 31, 2019 4:51 AM
Exit mobile version