महिलांनी हातात बांगड्या का घालाव्यात ?

महिलांनी हातात बांगड्या का घालाव्यात ?

स्त्रियांच्या हातातील बांगड्या फक्त त्यांचे सौंदर्य वाढवत नाही तर त्यांचे होणारे फायदे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सौभाग्यवती महिलांसाठी बांगड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काचेची बांगडी असो किंवा सोने-चांदी, श्रृंगारात या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बांगड्यांना खूप महत्त्व आहे. महिलांनी नियमितपणे बांगड्या घातल्यास त्यांना अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.

बांगड्या घालण्याचे महत्त्व

परंपरेने विवाहित महिलांनी बांगड्या घातल्या नाहीत तर ते अशुभ मानले जाते. कारण असे मानले जात होते की ज्या स्त्रिया बांगड्या घालत नाहीत त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. हिंदू संस्कृतीत असे मानले जाते की विवाहित महिलांनी बांगड्या घातल्याने पतीचे वय वाढते. 16 अलंकारांपैकी हा एक अत्यावश्यक अलंकार मानला जातो. यामुळेच दुर्गादेवीला मेकअपच्या वस्तू अर्पण केल्या जातात तेव्हा त्यात बांगड्यांचा समावेश नक्कीच केला जातो

बांगड्या घालण्याचे आरोग्याला होणारे फायदे

बांगडीची अख्यायीका 

ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्याचा आवाज राहतो, त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते. अशा घरामध्ये सुख, शांती, स्मृती राहते अशी अख्यायीका आहे. फक्त बांगड्या घातल्याने सकारात्मक फळे प्राप्त होऊ शकत नाहीत व नकारात्मकता बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून पूर्वी स्त्रिया बांगड्या घालयच्या आता बांगड्याच्या ऐवजी अनेक वस्तू किंवा ब्रेसलेट इतर गोष्टी परिधान करतात.

हेही वाचा : Astrology – या डाळींचे दान केल्याने उजळेल नशीब

__________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

First Published on: May 2, 2024 12:08 PM
Exit mobile version