जोडीदार आपसूकच आयुष्यात येतो

जोडीदार आपसूकच आयुष्यात येतो

‘लव्ह रुल्स फायडिंग अ रिअल रिलेशनशिप इन अ डिजीटल वर्ल्ड’ या पुस्तकाच्या लेखिका जोआना कोल्स यांनी सध्याच्या डिजीटल युगातील लव्ह रिलेशनशिप आणि डेटिंगबद्दल मांडलेले मत जाणून घेऊ या सविस्तर..

डिजीटल डेटींग

आजकाल डिजीटल मीडियामुळे कधीच प्रत्यक्ष न भेटलेल्या आणि जराही सर्वार्थाने परिचय नसलेल्या व्यक्तीसोबत ऑनलाईन डेटिंग आजच्या तरुणांकडून केल जातं. मात्र या प्रकारात पडण्या अगोदर आपल्याला कसा आणि कोणत्या विचारांचा जोडीदार हवा याबद्दलचा दृष्टीकोन हा स्वच्छ आणि स्पष्ट असायला हवा. जोआना कोल्स यांच्या मते जर एखाद्या व्यक्तीला त्याचे सोशल नेटवर्क अर्थात सामाजिक संपर्क वाढवायचा असेल तर डिजटल डेटिंग हे चांगलं माध्यम आहे.

फायदे आणि तोटे

जोआना कोल्स यांच्या म्हणण्याप्रमाणे डेटिंगकडे नकारात्मक दृष्टीने बघायला नको.
त्यातून काहीच साध्य होत नाही असे अजिबातच नाही. यातून एखाद्या व्यक्तीला आयुष्याचा जोडीदार मिळून त्याच लग्न होऊ शकतं. किंवा किमानपक्षी रोमँटिक जवळीक तर नक्कीच निर्माण होण्याची शक्यता असते. समजा डेटिंगचा असा कुठलाच फायदा झाला नाही तरी कोणीच स्वत:पासून दूर जात नाही. एकटेपणा ही स्वत:ची ओळख कायम राहतेच.

… तर फार विचारही करु नका

अनेकांना डेटिंग हा प्रकारच आवडत नाही अथवा नकोसा वाटतो. अनेकांसाठी हे वेळ वाया घालवणच असतं. त्यापेक्षा आपल्याला आवडणार्‍या क्षेत्रात काम करावं, आपलं सोशल नेटवर्क असावं असं अनेकांना वाटतं. त्यांच्याही मनाचा आदर हा व्हायलाच हवा. आपल्याला जोडीदार हवाच यासाठी प्रत्येकाने हाकारे देण्याची गरज नसते. जोडीदार आपसूकच आपल्या आयुष्यात येतो आणि सगळे सूर जुळून आले तर दोन जीव एकमेकात विरघळूनही जातात. योग्य वेळेची वाट बघणं हेच प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे.

First Published on: September 26, 2018 12:30 AM
Exit mobile version